देऊळगाव राजे, ता. २९ : दिलासा मायक्रोफायनान्य फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगले सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचा निश्चितपणे सर्वसामान्य नागरिकांना लाभ होत आहे. यामुळे त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत कंपनी सेक्रेटरी जयवंत भावे यांनी व्यक्त केले.
मलठण (ता.दौंड) येथे दिलासा मायक्रो फायनान्स फाउंडेशन दौंड व बीबीडी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या संयुक्त विघमाने जिल्हा परिषद शाळांना शालेय साहित्य व महिलांसाठी मोफत व्यावसायिक प्रशिक्षण उपक्रम अंतर्गत शिवणकाम, विणकाम प्रमाणपत्र वाटप समारंभामध्ये ते बोलत होते.
यावेळी चारुदत्त भावे, चित्रा भावे, धनवंती भावे, राज्यकर विक्रीकर उपायुक्त संभाजी यादव, सरपंच मनीषा यादव, ॲड. रमाकांत प्रभुणे, ॲड. नितीन अवचट, केंद्रप्रमुख महादेव कोपनर, दिलासाचे अध्यक्ष कैलास चव्हाण, संचालक मनोहर इंगवले, नितीन वाळके, अप्पासाहेब मेंगावडे, पोलिस पाटील राधिका पहाणे, देविदास सूर्यवंशी उपस्थित होते.
कार्यक्रमात बोरीबेल, खंडोबा नगर, देऊळगाव राजे, हिंगणीबेर्डी, काळेवाडी, विठ्ठलनगर, वाटलुज, नायगाव, तवपुनर्वसन, कोशिंमघर या शाळांना लाऊड स्पीकच,वॉटर फिल्टर,कपाट, टेबल,खुर्ची अशा साहित्याचे वाटप केले. दिलासाच्या वतीने राजेंद्र कदम, तृप्ती येवले, गौरव दगडे, साक्षी शेळके यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला.
सूत्रसंचालन कैलास चव्हाण यांनी केले.