राजस्थानच्या जालौर जिल्ह्यातील पोलीस हवालदाराचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल होत आहे. महामार्गावर कारमध्ये पोलीस हवालदार एका महिलेसोबत अश्लील चाळे करताना आढळला. हनुमान राम असं पोलीस हवालदाराचं नाव असून तो एका विवस्त्र महिलेसोबत कारमध्ये होता. गावकऱ्यांनी दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं होतं. दोघांचाही व्हिडीओ शूट केला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी कारवाई करत पोलीस हवालादाराला निलंबित केलंय.
याबाबत मिळालेली माहिती अशी, पोलीस हवालदाराचे तीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर पोलीस अधीक्षक ज्ञानचंद यादव यांनी कठोर कारवाई करताना या प्रकरणाची चौकशी पोलीस उपअधीक्षकांकडे सोपवली आहे. पोलीस हवालदार हनुमान राम महामार्गावर एका बाजूला कारमध्ये गर्लफ्रेंडसोबत अश्लील चाळे करत होता. त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या गावकऱ्यांनी त्यांचा व्हिडीओ केला. गावकऱ्यांनी कारला घेरून गोंधळ घातला. जालौरच्या पोलीस अधीक्षकांनी व्हिडीओची सत्यता पडताळल्यानंतर पोलीस हवालदाराची खात्यांतर्गत चौकशी सुरू केलीय.
जालौर पोलिसांनी सोशल मीडियावर सांगितलं की, हे प्रकरण गांभीर्याने घेण्यात आलं आहे. हनुमान राम याच्यावर कारवाई केली असून निलंबित करण्यात आलंय. प्राथमिक तपास पोलीस उपअधीक्षक करत आहेत. चार वर्षांपूर्वी हनुमान रामची बदली उदयपूरहून जालौरला झाली होती. जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी त्याची पोस्टिंग होती. सध्या सरवाना ठाण्याअंतर्गत डुंगरी पोलीस चौकीत तो कार्यरत होता. पोलीस हवालदाराच्या 'कार'नाम्याने खळबळ उडाली असून व्हायरल व्हिडीओची चर्चा आहे.