मुंबईतील सेनापती बापट उड्डाणपुलावर एक मोठा अपघात घडल्याचे समोर आले आहे. यात एक कार आणि टॅक्सीची समोरासमोर टक्कर झाली. ज्यामुळे दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईतील दादर परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १:१५ वाजता सेनापती बापट उड्डाणपुलावर एका महिंद्रा एसयूव्हीची टॅक्सी एका सॅन्ट्रो टॅक्सी कारशी धडक झाली. ज्यात टॅक्सी चालक आणि एका महिला प्रवाशाचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. टॅक्सी चिचपोकळीकडे जात असताना तर एसयूव्ही वांद्रेकडे जात असताना ही घटना घडली आहे.
या घटनेतील पोलिसांनी एसयूव्ही चालकाला ताब्यात आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या भयानक दृश्यांमध्ये टॅक्सीमधील महिला प्रवाशाचा अपघात झाला आहे. तिचे अर्धे शरीर कारच्या खिडकीबाहेर लटकलेले आहे. अपघातात कॅबचे बोनेट आणि पुढच्या सीटचे नुकसान झाले आहे. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
या अपघातात एसयूव्हीचा बोनेट, विंडशील्ड आणि पुढचे टायरही खराब झाले. दृश्यांमध्ये एसयूव्हीमधील एअरबॅग्ज डिफ्लेटेड असल्याचे दिसून आले आहे. ज्या धडकेच्या धक्क्यामुळे निकामी झाल्या असाव्यात. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे. अपघातामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्याचे काम पोलीस करत आहेत. तसेच या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.