उन्हाळ्यात चेहरा टॅन होणं सामान्य आहे. पण काही सोप्या उपायांनी तुम्ही हे टाळू शकता. चला, जाणून घेऊया चेहरा टॅन होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टी वापराव्यात.
उन्हाळ्यात बाहेर जाताना चेहऱ्यावर सनस्क्रीन लावणे खूप महत्त्वाचे आहे. सनस्क्रीनचे नियमित वापराने तुमचा चेहरा टॅन होण्यापासून वाचतो.
उन्हातून घरी आल्यानंतर, चेहरा डायरेक्ट साबणाने धुण्याऐवजी आधी बर्फ घेऊन चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचा ताजेतवानी आणि थंड होते. १५ मिनिटांनी चेहरा धुवा.
हळद आणि दह्याचं फेस मास्क चेहऱ्यावर लावा. याने चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो मिळतो आणि टॅन कमी होतो.
पाणी अधिक प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते, ज्यामुळे त्वचा ताजीतवानी आणि सुंदर दिसते.
सूर्याच्या तीव्र किरणांपासून बचाव करण्यासाठी हॅट घाला. त्याचबरोबर सनग्लासेस देखील चेहऱ्याचा टॅन कमी करण्यात मदत करतात.