किन्हवली (बातमीदार)ः रमजान, महाराष्ट्रदिनासह आगामी धार्मिक सण साजरे करताना कायदा व सुव्यवस्था कायम ठेवत शांतता राखण्याचे प्रयत्न पोलिसांकडून केले जात आहेत. याच अनुषंगाने शहापूरमध्ये पोलिस, दक्षता, शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी, पोलिस पाटील, प्रतिष्ठित नागरिकांची संयुक्त बैठक झाली. या वेळी इतरांच्या भावना दुखावणार नाहीत, यासाठी समन्वय साधण्याचे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी केले. या बैठकीला कसारा, शहापूर, वासिंद, किन्हवली येथील पोलिस ठाण्यातील शांतता, दक्षता कमिटीचे सदस्य, पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर, दक्षता कमिटीच्या विद्या वेखंडे, कल्पना तारमळे, डॉ. अपर्णा खाडे, संगीता पाटेकर आदी उपस्थित होत्या.