मुरबाड (बातमीदार)ः मुरबाड येथील क्रिदय पिसाटने इंडियन टॅलेंट ऑलिंपियाड परीक्षेत विज्ञान विषयात उत्तीर्ण होताना राज्यस्तरावर सातवा क्रमांक मिळवला होता. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात दोन सत्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. अंतिम सत्रातील परीक्षेला पात्र ठरलेला कुमार क्रिदय मुरबाड तालुक्यातील सासणे येथील पाणिनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता तिसरीत शिकत आहे. त्याला बुद्धिबळाची विशेष आवड आहे. मुरबाड दैवज्ञ समाजोन्नती परिषदेने त्याचे अभिनंदन केले आहे.