दररोज केसांना कंडिशनर लावणे योग्य आहे का? जाणून घ्या तज्ञांचे मत
GH News March 30, 2025 08:08 PM

हिवाळा असो वा उन्हाळा, कोणत्याही ऋतूत केसांची काळजी घेणे आवश्यक असते. अशातच आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि अशा परिस्थितीत त्वचेसोबतच केसांचीही अतिरिक्त काळजी घेणे महत्वाचे असते. त्यात आपण प्रत्येकजण केस धुतांना नियमितपणे शाम्पू नंतर कंडिशनर लावतोच. जेणेकरून केस मऊ आणि चमकदार दिसावेत. पण असे काही लोक आहेत जे रोज केस धुतात आणि केसांना रोज कंडिशनरचा वापर करतात. यावेळी त्वचारोगतज्ज्ञ विजय सिंघल म्हणतात की, काही लोकांना कंडिशनर जास्त लावण्याची सवय असते. केसांना लावल्यानंतर ते रेशमी आणि मऊ होतात. पण आपल्यापैकी अनेकांना असा प्रश्न पडतोकी केसांसाठी कंडिशनर रोज वापरावे का? चला तज्ञांकडून याबद्दल जाणून

घेऊयात…

केसांना दररोज कंडिशनर लावू शकतो का?

तज्ञांचे म्हणणे आहे की कंडिशनरमध्ये अनेक प्रकारची कॅमिकल असतात. त्यामुळे तुम्ही जर दररोज कंडिशनर केसांना लावल्याय केस चिकट होऊ शकतात. याशिवाय, कंडिशनरमध्ये असलेले कॅमिकल केसांना नुकसान पोहोचवू शकतात. त्याच वेळी, जर तुमचे केस आधीच तेलकट असतील तर दररोज कंडिशनर लावल्याने केसांमध्ये जास्त तेल जमा होऊ शकते आणि केस अधिकच तेलकट होतील.

ते किती दिवस वापरावे?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की तुम्ही कंडिशनर किती दिवस लावता हे तुमच्या केसांवरही अवलंबून असते. जर तुमचे केस जाड असतील तर तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा कंडिशनर वापरू शकता. जर तुम्हाला केस गळण्याची समस्या असेल तर कोणत्याही प्रकारचे कंडिशनर वापरू नका. तज्ञांच्या सल्ल्यानेच कंडिशनर लावणे फायद्‌याचे ठरेल.

कंडिशनर लावण्याची योग्य पद्धत

केसांच्या लांबीपासून टोकापर्यंत कंडिशनर वापरा, परंतु केसांमध्ये अधिक तेल जमा होऊ नये यासाठी मुळांपासून कंडिशनर लावू नका.

जास्त प्रमाणात कंडिशनर लावणे केसांसाठी हानिकारक ठरू शकते. नेहमी कमी प्रमाणात वापरा

कंडिशनर लावल्यानंतर काही मिनिटे केस तसेच ठेवल्याने खूप चांगले रिजल्ट तुम्हाला मिळेल.

जर तुमचे केस कोरडे आणि कुरळे असतील तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा कंडिशनर वापरणे फायदेशीर ठरू शकते. पण जर तुमचे केस तेलकट असतील तर ते मर्यादित प्रमाणातच वापरा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.