HDFC बँकेचा डंका! फक्त पाचच दिवसात कमावले 44,934 कोटी रुपये, 15 गुंतवणूकदार मालामाल
Marathi March 30, 2025 08:24 PM

एचडीएफसी बँक: शेअर बाजारात (Share Market) सातत्यानं चढ उतार होत आहे. अनेक कंपन्यांच्या शेअर्स चांगले कमाई करत आहेत. विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँकेच्या (एचडीएफसी बँक) शेअर्सची किंमत गुंतवणूकदारांना धक्का देत होती. मात्र गेल्या 5 दिवसांत बँकेच्या शेअरने सर्वाधिक संपत्ती कमावली आहे. गेल्या 5 दिवसात 44,934 कोटी रुपये कमावले आहेत. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना नफा मिळेल की नाही याची चिंता होती. एचडीएफसी बँकेचा प्रताप पुन्हा दिसू लागला आहे. 15 दिवसांत गुंतवणूकदारांना चांगला नफा झाला आहे.

देशातील टॉप 10 कंपन्यांचे बाजार भांडवल पाहिल्यास गेल्या आठवड्यात 10 पैकी 8 कंपन्या सकारात्मक क्षेत्रात होत्या. त्यांच्या निव्वळ मूल्यात 88,085.89 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. एचडीएफसी बँकेला सर्वाधिक फायदा झाला. गेल्या आठवड्यात सेन्सेक्सने 509.41 अंकांची वाढ नोंदवली आहे.

गुंतवणूकदारांनी कमावले 44,934 कोटी रुपये

गेल्या आठवड्यात, HDFC बँकेचे बाजार भांडवल 44,933.62 कोटी रुपयांनी वाढून 13,99,208.73 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एखाद्या कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये झालेली वाढ ही प्रत्यक्षात तिच्या शेअर्सच्या एकूण मूल्यात झालेली वाढ असते. अशाप्रकारे, ते मालमत्तेच्या मूल्यात वाढ दर्शविते म्हणजे त्या कंपनीच्या भागधारकांचा परतावा. एचडीएफसी बँकेनंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजार भांडवलात सर्वाधिक वाढ दिसून आली. तो 16,599.79 कोटी रुपयांनी वाढून 6,88,623.68 कोटी रुपये झाला. तर टीसीएसचा एमकॅप 9,063.31 कोटी रुपयांनी वाढून 13,04,121.56 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

देशातील दुसरी सर्वात मोठी खाजगी बँक ICICI बँकेचे बाजारमूल्य 5,140.15 कोटी रुपयांनी वाढून 9,52,768.61 कोटी रुपये झाले आहे. आयटीसीच्या एमकॅपमध्ये 5,032.59 कोटी रुपयांची वाढ होऊन ती 5,12,828.63 कोटी रुपयांवर पोहोचली. तर हिंदुस्थान युनिलिव्हरचे मूल्यांकन 2,796.01 कोटी रुपयांनी वाढून 5,30,854.90 कोटी रुपये झाले. भारती एअरटेलच्या बाजारातील स्थितीही या आठवड्यात सुधारली आहे. ते 2,651.48 कोटी रुपयांनी वाढून 9,87,005.92 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर बजाज फायनान्सचा एमकॅप रु. 1,868.94 कोटींच्या वाढीसह 5,54,715.12 कोटींवर पोहोचला आहे.

रिलायन्स आणि इन्फोसिसला तोटा

बाजारातील वाढत्या ट्रेंडच्या विरोधात, इन्फोसिसचा एमकॅप या कालावधीत 9,135.89 कोटी रुपयांनी घसरून 6,52,228.49 कोटी रुपयांवर आला. त्याच वेळी, देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मूल्य 1,962.2 कोटी रुपयांनी घटून 17,25,377.54 कोटी रुपये झाले. रँकिंगनुसार, टॉप-10 कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर अनुक्रमे एचडीएफसी बँक, टीसीएस, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस, बजाज फायनान्स, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसी यांचा क्रमांक लागतो.

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.