ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबली अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला वैताग…
Marathi March 30, 2025 08:24 PM

Ghibli Art: इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर सध्या घिबली आर्ट (Ghibli Art) च्या अ‍ॅनिमेटेड फोटोचा ट्रेंड सुरु आहे. अनेक जण ओपन एआयच्या चॅटजीपीटी आणि एक्स वरील ग्रोक प्लॅटफॉर्मच्या मदतीनं फोटो बनवून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. हा ट्रेंड अनेकांकडून फॉलो केला जात आहे. राजकारण्यांकडून देखील या ट्रेंडमध्ये सहभागी होत फोटो शेअर केले जात आहेत. मात्र, तुम्हाला घिबली अ‍ॅनिमेशन नेमकं काय आहे? हे माहिती असणं आवश्यक आहे.

घिबलीचं जपान कनेक्शन

घिबली हा जपानमधील सर्वात मोठा अ‍ॅनिमेशन स्टुडिओ आहे. या स्टुडिओची स्थापना हायाओ मियाजाकी, इसाको ताकाहाता आि तोशियो सुझुकी यांनी 1985 मध्ये केली होती. घिबली स्टुडिओनं बनवलेल्या अनेक चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत.  यामध्ये Spirited Away आणि The Boy and The Heron याचा समावेश आहे. घिबली अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या चित्रपटाचे जगभर चाहते आहेत. या स्टुडिओचे चित्रपट नेटफ्लिक्स वर आहेत. अ‍ॅनिमेशन जगातील बादशाह  अशी ओळख मियाजाजाकी अशी आहे. मात्र, त्यांना आय जनरेटेड आर्ट पसंत नाही. त्यांनी यावर टीका केली आहे.

मियाजाकी यांची नेटवर्थ किती?

घिबली स्टुडिओचे मालक हायाओ मियाजाकी यांची संपत्ती 50 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. अ‍ॅनिमेशनच्या जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून मियाजाकीची ओळख आहे. त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य मार्ग घिबली स्टुडिओचा व्यवसाय आहे. डीव्हीडी, मर्चंटस सेल्स आणि ऑनलाईन स्ट्रीमिंग हक्क या द्वारे घिबली स्टुडिओची कमाई होते.

ChatGPT मुळं घिबली स्टुडिओला किती धोका?

चॅटजीपीटी च्या फोटो जनरेशन  फीचर्सचा परिणाम घिबली स्टुडिओवर किंवा त्यांच्या संस्थापकांच्या कमाईवर किती परिणा होईल हे अद्याप समोर आलं नाही. एआय जनरेटेड अ‍ॅनिमेशनच्या या ट्रेंडमुळं घिबली स्टुडिओच्या चाहत्यांमध्ये नाराजी आहे. मियाजाकी यानी देखील यावर टीका केली आहे.

2016 मध्ये हायाओ मियाजाकी यांनी  एआय जनरेटेड अ‍ॅनिमेशन पाहून मला पूर्णपणे वैताग आला आहे असं म्हटलं होतं. हा मानवी जीवनाचा अपमान असल्याचं मला ठामपणे वाटतं, असं ते म्हणाले होते.

हेदेखील वाचा

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.