RR vs CSK Live : 'RRR'..! नितीश राणा ऑन फायर, राजस्थान रॉयल्सची फटकेबाजी; चेन्नई सुपर किंग्सचे शेवटच्या ५ षटकांत कमबॅक
esakal March 31, 2025 03:45 AM

RR vs CSK Live Match Marathi Update: गुवाहाटीच्या मैदानावरील यंदाच्या पर्वातील आपल्या शेवटच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चांगला खेळ केला. पहिल्या षटकात विकेट गमावूनही व संजू सॅमसन यांच्या ८२ धावांच्या भागीदारीने ची डोकेदुखी वाढवली. पण, नितीशच्या विकेटनंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. मथिशा पथिराणा व विजय शंकर यांनी घेतलेले अफलातून झेल, चर्चेच राहिले. या सामन्यात RR सह राणा व रियान यांच्या R ची चर्चा राहिली आणि ही मॅच खऱ्या अर्थाने 'RRR' ठरली.

यशस्वी जैस्वाल पहिल्या षटकात माघारी परतल्यानंतर नितीश राणा व संजू सॅमसन ही जोडी मैदानावर उभी राहिली. या दोघांनी ४२ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी करून संघाला सावरले. नितीश राणाने २०२३ नंतर पहिले अर्धशतक झळकावताना चेन्नईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. ही जोडी तोडण्यासाठी नूर अहमदला पाचारण केले गेले आणि त्याने पहिल्याच षटकात कमाल केली. संजू १६ चेंडूंत २० धावा करून झेलबाद झाला.

राणाने ३६ चेंडूंत १० चौकार व ५ षटकारासह ८१ धावा कुटल्या. आर अश्विनने चतुराईने राणाची विकेट मिळवली. पुढे येऊन फटका मारणाऱ्या राणाला चकवा देत अश्विनने वाईड चेंडू टाकला अन् धोनीने स्टम्पिंग केली. आयपीएलमध्ये ८०-९९ धावसंख्येत नितीश चौथ्यांदा बाद झाला आहे आणि विराट कोहली, जोस बटलर व ग्लेन मॅक्सवेल यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. ख्रिस गेल व डेव्हिड वॉर्नर सर्वाधिक ७ वेळा या धावसंख्येत बाद झाले आहेत. फॅफ ड्यू प्लेसिस ५ वेळा शतकाच्या उंबरठ्यावरून माघारी परतला आहे.

कर्णधार रियान परागने चांगली खेळी केली, परंतु समोर त्याच्यासोबत कोण उभं राहिलं नाही. ध्रुव जुरेल ( ३) व वनिंद हसरंगा ( ४) हे कमी धावांवर बाद झाले. मथिशा पथिराणा व विजय शंकर यांनी अफलातून झेल घेत या दोघांना माघारी पाठवले. पण, रियान मैदानावर उभा राहिला आणि त्याच्या फटकेबाजीने सर्वांना अवाक् केले. प्रतिस्पर्धी सोडा सहकारीही त्याचे फटके पाहून चक्रावले.

१८व्या षटकात पथिराणाचा वेगवान चेंडू परागच्या मनगटावर आदळला आणि कर्णधार वेदनेने विव्हळत मैदानावर झोपला. प्राथमिक उपचारानंतर तो पुन्हा फलंदाजीला उभा राहिला, परंतु पथिराणाने यॉर्करवर त्याचा त्रिफळा उडवला. रियान २८ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३७ धावांवर बाद झाला. शिमरोन हेटमायर मैदानावर उभा राहिला आणि संघाला ९ बाद १८२ धावांपर्यंत पोहोचवले. शेवटच्या पाच षटकांत चेन्नईच्या गोलंदाजांनी सुरेख मारा करताना राजस्थानला धक्के दिले. नूर अहमद, खलील अहमद व मथिशा पथिराणा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.