आघाडीच्या १० पैकी ८ कंपन्यांचे बाजार भांडवल ८८,०८५ कोटींनी वाढले; एचडीएफसी बँकेला सर्वाधिक फायदा
ET Marathi March 31, 2025 03:45 PM
Top 10 Companies Market Cap : शेअर बाजारात मागील आठवड्यात सर्वाधिक मूल्य असलेल्या १० पैकी ८ कंपन्यांच्या बाजार भांडवल ८८,०८५ कोटींनी वधारले आहे. ज्यामध्ये एचडीएफसी बँकेला सर्वाधिक फायदा झाला आहे. ही वाढ बाजारातील सकारात्मकतेचा ट्रेंड दर्शवते. मागील आठवड्यात मुख्य निर्देशांक ०.६६ टक्क्यापर्यंत वधारले.शेअर बाजारातील आघाडीच्या १० कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक, टाट कंसल्टन्सी सर्विसेस (TCS), भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, भारतीय स्टेट बँक, बजाज फायनान्स, हिंदुस्थान युनिलिवर आणि आयटीसीला लाभ झाला आहे. यासोबतच रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.समिक्षाधीन कालावधीत एचडीएफसी बँकेच्या बाजार भांडवलात ४४,९३३.६२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ज्याचे मूल्यांकन १३,९९,२०८ कोटी इतके झाले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवल १६,०४,१२१.५६ कोटी झाले आहे. तसेच आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल ५१४० कोटींनी वाढून ९,५२,७६८ कोटी इतके झाले आहे.आयटीसीचे बाजार भांडवल ५,०३२.५९ कोटी रुपयांनी वाढून ५,१२,८२८.६३ कोटी रुपयांवर पोहोचले आणि हिंदुस्तान युनिलिव्हरचे बाजार भांडवल २,७९६.०१ कोटी रुपयांनी वाढून ५,३०,८५४.९० कोटी रुपयांवर पोहोचले.भारती एअरटेलचे बाजार भांडवल २,६५१.४८ कोटी रुपयांनी वाढून ९,८७,००५.९२ कोटी रुपयांवर पोहोचले. बजाज फायनान्सचे बाजार भांडवल १,८६८.९४ कोटी रुपयांनी वाढून ५,५४,७१५.१२ कोटी रुपयांवर पोहोचले.तसेच, इन्फोसिसचे मूल्यांकन ९,१३५.८९ कोटी रुपयांनी घसरून ६,५२,२२८.४९ कोटी रुपयांवर पोहोचले आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्यांकन १,९६२.२ कोटी रुपयांनी घसरून १७,२५,३७७.५४ कोटी रुपयांवर पोहोचले.टॉप-१० कंपन्यांच्या क्रमवारीत रिलायन्स इंडस्ट्रीजने सर्वाधिक मूल्यवान कंपनीचा किताब कायम ठेवला आहे. त्यानंतर एचडीएफसी बँक, टीसीएस, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि आयटीसी यांचा क्रमांक लागतो.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.