Panchang 31 march 2025: आजच्या दिवशी शिव कवच स्तोत्राचे पठण करावे
esakal March 31, 2025 05:45 PM

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ३१ मार्च २०२५

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक  चैत्र १० शके १९४७

☀ सूर्योदय -०६:३३

☀ सूर्यास्त -१८:४५

चंद्रोदय - ०७:४०

⭐ प्रात: संध्या - स.०५:१९ ते स.०६:३५

⭐ सायं संध्या -  १८:४५ ते २०:०१

⭐ अपराण्हकाळ - १३:४९ ते १६:१३

⭐ प्रदोषकाळ - १८:४५ ते १९:५५

⭐ निशीथ काळ - २४:१२ ते २५:००

⭐ राहु काळ -  ०७:५९ ते ०९:३२

⭐ यमघंट काळ - ११:०२ ते १२:३६

⭐ श्राद्धतिथी -  तृतीया श्राद्ध

सर्व कामांसाठी दु.०४:३० प. शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:३७ ते दु.०१:५३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

**या दिवशी डोरली खावू नये .

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:४० ते १७:१३

अमृत मुहूर्त-- १७:१३ ते १८:४५

विजय मुहूर्त— १४:४० ते १५:२८

पृथ्वीवर अग्निवास नाही.

सूर्य मुखात आहुती आहे.

शिववास १२:११ प. गौरीसंनिध, काम्य शिवोपासनेसाठी १२:११ प. प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४७

संवत्सर - विश्वावसु

अयन - उत्तरायण

ऋतु -  वसंत(सौर)

मास - चैत्र

पक्ष -   शुक्ल

तिथी - द्वितीया(१२:११ प.नं. तृतीया)

वार -   सोमवार    

नक्षत्र -  अश्विनी (१६:४३ प.नं. भरणी)

योग -  वैधृती (१६:३० प.नं. विष्कंभ)

करण - कौलव(१२:११ प. नं. तैतिल)

चंद्र रास - मेष

सूर्य रास - मीन

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:-- नेत्रव्रत, प्रकृतिपुरुष द्वितिया व्रत, ब्रह्मदेवास दवणा वाहणे, मत्स्यावतारः (अपराण्हे), श्रीअक्कलकोट स्वामी-संत झुलेलाल जयंती, ईद-उल-फितर, सूर्याचा रेवती नक्षत्र प्रवेश १३.१९, तृतीया श्राद्ध, मु.सव्वाल १० हिजरी सन १४४६

  या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून अभ्यंगस्नान करावे.

  शिव कवच स्तोत्राचे पठण करावे.

  ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

   शंकराला सायंकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवावा.

सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

  दिशाशूल पूर्व दिशेस असल्याने पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, मिथुन , कर्क , तूळ , वृश्चिक , कुंभ या राशींना दिवसभरचंद्रबळ अनुकूल आहे.

✅विशेष- येत्या १ एप्रिल २०२५ रोजी शनी महाराज कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करीत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.