Walmik Karad: बीडच्या जेलमध्ये राडा! वाल्मिक कराडसह सुदर्शन घुलेला मारहाण
esakal March 31, 2025 10:45 PM

Beed Crime: बीडमधून एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे. ज्या जेलमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले आहेत, त्याच जेलमध्ये राडा झाला आहे. या भांडणांमध्ये वाल्मिक कराडसह सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची माहिती आहे. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.

तुरुंग प्रशासनाने याबाबत अद्याप कुठलीही माहिती दिलेली आहे. मात्र वाल्मिक कराडला आठवले नावाच्या कैद्याकडून मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. महादेव गित्ते आणि अक्षय आठवले या दोघांकडून कराड, घुले या दोघांना मारहाण झाल्याची माहिती आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.