Jasmin Walia : आयपीएल सामन्यांमधील कामगिरीव्यतिरिक्त, क्रिकेटपटू हार्दिक पंड्या त्याची कथित प्रेयसी जास्मिन वालियामुळेही चर्चेत आहे. गेल्या काही काळापासून, हा क्रिकेटपटू ब्रिटिश गायिका जास्मिन वालियाला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. या गायिकेला अनेक वेळा क्रिकेटपटूला सपोर्ट करताना स्टेडियमध्ये हायलाईट करण्यात आले आहे.
काल रात्री, मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यातील सामन्यादरम्यान, जास्मिन हार्दिक आणि त्याच्या संघाला चियर करताना दिसली. नंतर ती मुंबई इंडियन्सच्या बसमध्येही जाताना दिसली. सहसा, फक्त क्रिकेटपटूचा संघ आणि त्याच्या जवळच्या लोकांनाच या बसमध्ये बसण्याची परवानगी असते. त्यामुळे नेटकरी या दोघांच्या डेटिंगबद्दल वेगवेगळे अंदाज लावत आहेत.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये जास्मिन वालिया मुंबई इंडियन्सच्या बसमध्ये चढताना दिसत आहे. यावेळी तिने एक लांब काळा ड्रेस घातला होता. जास्मिन बसमध्ये चढते आणि मागच्या सीटवर बसते. या व्हिडिओवरील कमेंट बॉक्समध्ये एका युजरने लिहिले की, 'जर ती टीम आणि फॅमिली बसमध्ये असेल तर ही अफवा नाही तर कन्फर्म गर्लफ्रेंड आहे', दुसऱ्या युजरने लिहिले की, ती आता पंड्याच्या कुटुंबातील एक सदस्य आहे. आणखी एकाने लिहिले, हिने तरी पंड्यासोबत आयुष्यभर खुश राहावं.
त्याची एक्स पत्नी नताशापासून वेगळे झाल्यापासून त्याचे नाव जास्मिन वालियाशी जोडले जात आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान, स्टेडियममध्ये हार्दिकला सपोर्ट करण्यासाठी आली होती. गेल्या वर्षी एका रेडिट युजरने त्यांच्या फोटोंद्वारे दावा केला होता की ते दोघेही एकाच ठिकाणी आणि एकाच वेळी एकत्र सुट्टी घालवत होते. दरम्यान, हार्दिक किंवा जास्मिनने यावर कधीही काहीही बोलले नाहीत.