सूर्यकुमार यादव सोडणार मुंबईची साथ? आयपीएल स्पर्धेदरम्यान खळबळ, सूर्या म्हणाला…
GH News April 03, 2025 01:06 AM

आयपीएल स्पर्धेत सूर्यकुमार यादवला फलंदाजीत सूर गवसताना दिसत आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने फॉर्मात परतल्याचं दाखवून दिलं आहे. असं सर्व काही मस्तपैकी सुरु असताना एक धक्कादायक बातमीने चाहत्यांमध्ये अस्वस्थता पसरली. सूर्यकुमार यादव मुंबई सोडणार असल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली आहे. नुसत्या शक्यतेच्या चर्चांना उधाण आलं. अनेकांनी मुंबई इंडियन्स संघ गृहीत धरला होता. पण ही बातमी मुंबई क्रिकेट टीमबाबत होती. पण त्या चर्चेत तरी दम आहे का? असा प्रश्न होता. त्यामुळे नेमकं काय झालं याची चर्चा सुरु जाली आहे. आयपीएल स्पर्धा सुरु असताना मध्येच असं काय? असे एक ना अनेक प्रश्न पडले आहेत. तर काही संघांनी देशांतर्गत क्रिकेटसाठी तयारी सुरु केली आहे. यापैकी गोवा संघाने नव्या सिझनसाठी संघ मजबूत करण्याची तयारी केली आहे. कारण गोवा संघाला रणजी ट्रॉफीत एलीट ग्रुपमध्ये प्रमोशन मिळालं आहे. त्यामुळे मजबूत संघांशी सामना करण्यासाठी गोवा क्रिकेट संघ चांगल्या खेळाडूंना संघात सहभागी करण्याचा प्रयत्नात आहे. त्यामुळे अशी अफवा उडाली आहे.

अफवा उडाल्यानंतर खुद्द सूर्यकुमार यादवने याबाबत स्पष्टीकरण दिल्याने चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. सूर्यकुमार यादवने आपल्या सोशल मिडिया उकाउंटवर पोस्ट करत लिहिलं की त्या रिपोर्टमध्ये काहीच तथ्य नाही. या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याने म्हटले की जर त्यांना अशा रिपोर्टवर हसायचे असेल तर विनोदी चित्रपट पाहणे थांबवतील आणि फक्त असे रिपोर्ट वाचतील.

गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) च्या सचिव शंभा देसाई यांनी सांगितले की, जीसीएने देशातील विविध राज्यांमधील संघांमधील अनेक खेळाडूंशी संपर्क साधला आहे. यशस्वी जयस्वाल गोव्याला जात असल्याच्या बातमीनंतर लगेचच ही सर्व माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, यशस्वी जयस्वालने मुंबई क्रिकेट संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गोवा संघात सामील होऊ इच्छित आहे. यासाठी जयस्वाल यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) साठी अर्ज केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.