सध्या बॉक्स ऑफिसवर सलमान खानचा 'सिकंदर' (Sikandar) चित्रपट गाजत आहे. या चित्रपटाले पहिले दोन दिवस उत्तम प्रतिसाद मिळाला होता. मात्र आता तिसऱ्या दिवशी 'सिकंदर'ची कामगिरी चिंताजनक आहे. कलेक्शनच्या आकड्यात घसरण झालेली पाहायला मिळत आहे. सलमान खानचा 'सिकंदर' सिनेमा हा ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी किती कोटींची कमाई केली जाणून घेऊयात.
खानचा 'सिकंदर' चित्रपट रिलीज होऊन आता तीन दिवस पूर्ण झाले आहेत. दोन दिवस चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. मात्र तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या आकड्यांमध्ये घसरण झालेली पाहायला मिळत आहे. 'सिकंदर' 30 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आला. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानच्या (Salman Khan) 'सिकंदर' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 26 कोटींची कमाई केली आहे. तर 'सिकंदर'ने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी 29 कोटींचा व्यवसाय केला आहे.
'सिकंदर'चे तिसऱ्या दिवशीच्या कलेक्शनचे आकडे निराशाजनक आहेत. 'सिकंदर' चित्रपटाने तिसऱ्या दिवशी फक्त 19.5 कोटींची कमाई केली आहे. 'सिकंदर'ने आतापर्यंत 74.5 कोटी रूपये कमावले आहे. आता भाईजानच्या '' चित्रपटाची 100 कोटींच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. अद्याप 'सिकंदर'ने चित्रपटाचे वसूल केले नाही आहे. 'सिकंदर'चा बजेट 180 कोटी आहे.
'सिकंदर' चित्रपटाचे दिग्दर्शन ए. आर. मुरुगदास यांनी केले आहे. 'सिकंदर' चित्रपटात सलमान खानसोबत साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ( Rashmika Mandanna ) पाहायला मिळत आहे. या चित्रपटात यांच्यासोबत काजल अग्रवाल, शरमन जोशी, प्रतिक बब्बर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. 'बाहुबली' फेम अभिनेते सत्यराज 'सिकंदर' चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत झळकला आहे. चित्रपटातील सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे.