Shree Siddhivinayak Temple Income: मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी लाखो लोक दर्शनासाठी येतात. सर्वसामान्यांपासून ते अब्जाधीशांपर्यंत सर्व लोक मंदिरात दर्शनासाठी येतात. पण, या मंदिराने विक्रमी कमाई केली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात या मंदिराने 133 कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली. ही आजपर्यंतची सर्वाधिक वार्षिक कमाई आहे.
रोख, ऑनलाइन व्यवहार आणि सोन्याच्या माध्यमातून या मंदिराला भाविकांकडून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहे. भाविकांची सतत वाढणारी संख्या आणि ऑनलाइन देणगीच्या पर्यायांमुळे हे उत्पन्न वाढले असल्याचे मंदिर प्रशासनाचे म्हणणे आहे. सोन्या-चांदीच्या 7 कोटी देणग्या, दानपेटीतून 98 कोटी रोख रक्कम, पूजा बुकिंग आणि प्रसाद यांसारख्या इतर स्त्रोतांमधून 10 कोटी रुपये मिळाले आहेत.
खरं तर, दरवर्षी गणेश चतुर्थी आणि इतर महत्त्वाच्या प्रसंगी बॉलीवूड स्टार्सपासून व्यावसायिकांपर्यंत लाखो भाविक सिद्धिविनायक मंदिराला भेट देतात. मात्र, सिद्धिविनायक मंदिराप्रमाणे भारतातील इतर धार्मिक स्थळांनाही शेकडो कोटी रुपयांच्या देणग्या मिळतात. आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर मंदिराचे वार्षिक उत्पन्न सुमारे 1500 कोटी ते 1650 कोटी रुपये आहे.
तर केरळच्या पद्मनाभस्वामी कमाई दरवर्षी 750 कोटी ते 800 कोटी रुपयांपर्यंत असते. हे दान केलेले पैसे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट मंदिराच्या देखभाल, सुरक्षा, विस्तारीकरण तसेच शिक्षण, वैद्यकीय सुविधा, गरीबांना मदत आणि सामाजिक कल्याणकारी योजनांसाठी वापरले जातात.