हल्ली मोबाइल आपल्या लाइफस्टाइलचा एक अविभाज्य घटक झाला आहे. दिवसाची सुरूवात ते रात्री झोपेपर्यत मोबाइलवर स्क्रोलींग केले जाते. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यत सर्वच वयोगटातील व्यक्ती तासनतास मोबाइलवर रिल्स पाहण्यात व्यस्त असलेल्या दिसतात. पण, या सवयीमुळे शरीरासह डोळ्यांवर खोलवर परिणाम होत आहे याकडे सर्वाचे दूर्लक्ष होत आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे सर्वच वयोगटातील व्यक्तींना डोळ्यांचे विविध आजार होत आहेत. यशोभूमी इंडिया इंटरनॅशनल कन्वेंशन एंड एक्सपो सेंटर येथे झालेल्या आशिया पॅसिफिक अॅकेडमी ऑफ ऑप्थॅल्मोलॉजी आणि ऑल इंडिया ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटीच्या बैठकीत नेत्रतज्ञांनी याबाबत धोकादायक इशारा दिला आहे. यात दृष्टी जाण्याचा धोका सांगण्यात आला आहे.
आशिया पॅसिफिक अॅकेडमी ऑफ ऑप्थॅल्मोलॉजीचे अध्यक्ष डॉ. ललित वर्मा यांनी याबाबत इशारा दिला आहे. त्यांनी त्याच्याकडे आलेल्या एका केसबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, काही दिवसांआधी एक विद्यार्थी आमच्याकडे आला होता. त्याला डोळ्यांमध्ये सतत जळजळ होतं होती. आम्ही त्याची तपासणी केल्यानंतर असे आढळले की, घरी बराच वेळ तो स्क्रोलींग करायचा, ज्यामुळे डोळ्यांमध्ये पुरासा ओलावा निर्माण होत नव्हता. त्यामुळे आम्ही औषधओपचार केले आणि त्याला 20-20-20 चा नियम पाळण्याचा सल्ला दिला.
20-20-20 चा नियम म्हणजे 20 मिनिटांनी 20 सेकंदाचा ब्रेक घेऊन 20 फूटांवर असलेल्या एखाद्या गोष्टीकडे पाहायचे.
डॉक्टर पुढे असे म्हणाले की, डिजिटल उपकरणांच्या निळ्या प्रकाशामुळे तरुणांना डोकेदुखी, मायग्रेन आणि झोपेसंबंधित समस्या जाणवू शकतात. तर तासनतास टिव्ही पाहणाऱ्याला मायोपिया होण्याचा धोका निर्माण होतो. अलीकडे केलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, 2050 पर्यत जगातील 50 टक्क्यांहून अधिक व्यक्तींना अंधत्व येऊ शकते.
हेही पाहा –