आयपीएलच्या 18 व्या मोसमादरम्यान भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या मायदेशातील मालिकांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. टीम इंडिया ऑक्टोबर- डिसेंबर दरम्यान 2 संघांविरुद्ध भिडणार आहे. टीम इंडिया मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. तर त्यानंतर महिन्याभरानंतर दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर येणार आहे. टीम इंडिया दोन्ही संघांविरुद्ध एकूण 4 मालिकांमध्ये 12 सामने खेळणार आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
टीम इंडिया विरुद्ध विंडिज यांच्यात 2 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहे. उभयसंघातील या मालिकेचं आयोजन हे 6 ते 25 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलं आहे. मालिकेतील पहिला सामना हा अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा आणि अंतिम सामना हा कोलकातामध्ये आयोजित करण्यात आला आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी,एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहेत. उभयसंघात 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याची सुरुवात 14 नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेने होणार आहे. पहिला कसोटी सामना हा 14 नोव्हेंबरला दिल्लीत होणार आहे. तर दुसरा आणि अंतिम सामना हा गुवाहाटीत 22 नोव्हेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. गुवाहाटीत कसोटी सामना खेळवण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
कसोटीनंतर दोन्ही संघात एकदिवसीय मालिका होईल. एकदिवसीय मालिकेत 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिला सामना 30 नोव्हेंबरला रांचीत होईल. दुसरा सामना 3 डिसेंबरला रायपूरमध्ये पार पडेल. तिसरा आणि अंतिम सामना 6
विंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकांचं वेळापत्रक
दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याची सांगता टी 20i मालिकेने होणार आहे. टी 20i मालिकेत 9 ते 19 डिसेंबरमध्ये एकूण 5 टी 20i सामने होणार आहेत. पहिला सामना 9 डिसेंबरला कटकमध्ये होईल. दुसरा सामना 11 डिसेंबर न्यू चडींगडमध्ये आयोजित करण्यात आला आहे. तिसरा सामना 14 डिसेंबरला धर्मशाळा येथे खेळवण्यात येईल. चौथ्या सामन्याचा थरार 17 डिसेंबरला लखनौत रंगेल. तर पाचवा आणि अंतिम सामना अहमदाबादध्ये पार पडेल.