जुनी सांगवी, ता.२ ः समर्थ युवा फाउंडेशन आणि सीझन सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने उद्या गुरुवारी (ता. ३) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा चौक, शुक्रवारी (ता. ४) शिवसृष्टी गार्डन जयमालानगर आणि शनिवारी (ता.५) मधुबन सोसायटी येथे विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात रक्तदाब, रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल, डोळे, दात, महिलांसाठी स्तन कर्करोग आदी तपासण्या करण्यात येणार आहेत. अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघ, मुळानगर मित्र मंडळ, शिवसृष्टी प्रतिष्ठान, शिवजिजाऊ महिला प्रतिष्ठान, सिद्धिविनायक प्रतिष्ठान हे शिबिरांचे संयोजन करणार आहेत. जुनी सांगवीतील सर्व नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सीझन सोशल ग्रुप व शिवजिजाऊ महिला प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.