Central Railway : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेने 'या' विशेष गाड्यांच्या सेवा कालावधीत केली वाढ; कोणाकोणाला फायदा?
Saam TV April 02, 2025 10:45 PM

दौंड - अजमेर - दौंड (साप्ताहिक) विशेष

गाडी क्रमांक 09626 दौंड ते अजमेर विशेष, जी आधी दिनांक २७ मार्च २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दिनांक १० एप्रिल २०२५ पासून दिनांक २६ जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

गाडी क्रमांक 09625 अजमेर ते दौंड विशेष जी आधी दिनांक २८ मार्च २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दिनांक ११ एप्रिल २०२५ पासून दिनांक २७ जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

सोलापूर - अजमेर - सोलापूर (साप्ताहिक) विशेष

गाडी क्रमांक 09628 सोलापूर ते अजमेर विशेष जी आधी दिनांक २७ मार्च २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दिनांक १० एप्रिल २०२५ ते दिनांक २६ जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

गाडी क्रमांक 09627 अजमेर ते सोलापूर विशेष, जी आधी दिनांक २६ मार्च २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दिनांक ९ एप्रिल २०२५ पासून दिनांक २५ जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

साई नगर शिर्डी - बीकानेर - साई नगर (साप्ताहिक) शिर्डी विशेष

गाडी क्रमांक 04716 साई नगर शिर्डी ते बीकानेर विशेष, जी आधी दिनांक ३० मार्च २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दिनांक १३ एप्रिल २०२५ पासून दिनांक २९ जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक 04715 बीकानेर ते साई नगर शिर्डी विशेष, जी आधी दिनांक २९ मार्च २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दिनांक १२ एप्रिल २०२५ वरून २८ जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

दादर - भुसावळ - दादर विशेष

गाडी क्रमांक 09051 दादर ते भुसावळ (आठवड्यातून तीन वेळा) विशेष, जी आधी दिनांक ३१ मार्च २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दिनांक २ एप्रिल २०२५ पासून दिनांक ३० जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

गाडी क्रमांक 09052 भुसावळ ते दादर (आठवड्यातून तीन वेळा) विशेष, जी आधी दिनांक ३१ मार्च २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दिनांक २ एप्रिल २०२५ पासून दिनांक ३० जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

गाडी क्रमांक 09050 भुसावळ ते दादर (आठवड्यातून) विशेष, जी आधी दिनांक २८ मार्च २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दिनांक ४ एप्रिल २०२५ पासून दिनांक २७ जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

गाडी क्रमांक 09049 दादर ते भुसावळ (आठवड्यातून) विशेष, जी आधी दिनांक २८ मार्च २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दिनांक ४ मे २०२५ पासून २७ जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

अनारक्षित विशेष रेल्वे सेवांचा विस्तार

बेळगावि - मिरज - बेळगावि विशेष

गाडी क्रमांक 07301 बेळगावि ते मिरज विशेष, जी आधी दिनांक ३१ मार्च २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दिनांक १ एप्रिल २०२५ पासून दिनांक ३१ जुलै २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

गाडी क्रमांक 07302 मिरज ते बेळगावि विशेष, जी आधी दिनांक ३१ मार्च २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दिनांक १ एप्रिल २०२५ पासून दिनांक ३१ जुलै २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

गाडी क्रमांक 07303 बेळगावि ते मिरज विशेष, जी आधी दिनांक ३१ मार्च २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दिनांक १ एप्रिल २०२५ ते दिनांक ३१ जुलै २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक 07303 बेळगावि ते मिरज विशेष, जी आधी दिनांक ३१ मार्च २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती १ एप्रिल २०२५ पासून दिनांक ३१ जुलै २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

07304 मिरज ते बेळगावि पर्यंतची जी आधी दिनांक ३१ मार्च २०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती दिनांक १ एप्रिल २०२५ दिनांक ३१ जुलै २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

दरम्यान, वरील गाड्यांच्या वेळेत, संरचनेत आणि थांब्यात कोणताही बदल होणार नाही. आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक 09626/09625, 09628/09627, 04716/04715, 09052/09051 09050/09049 च्या विस्तारित प्रवासासाठी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर विशेष शुल्कासह बुकिंग करता येईल. या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाऊनलोड करा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.