पराग ढोबळे
नागपूर : नागपूर शहरात दुचाकी चोरी करताना एकाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते. त्याची चौकशी करत गाडीची तपासणी केली असताना मोठा कारनामा समोर आला आहे. नागपूराच्या क्राइम ब्रॅंच युनीट तीनच्या पथकाने या अट्टल दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
च्या क्राईम ब्रँच युनिट तीनच्या पथकाने सचिन पुंडलिक अतकरी यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून नागपूर शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरी होत असल्याच्या घटना वाढल्या होत्या. या प्रकरणी पोलिसात तक्रारी देखील दाखल होत्या. या प्रकरणाचा पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरु होता. याच दरम्यान दुचाकी चोरटा चोरीची गाडी विकण्याच्या तयारीत असतांनानी सापळा लावून त्यास ताब्यात घेतले.
चोरीच्या बारा दुचाकी जप्त
पोलिसांनी सचिन यास ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली. तसेच त्याच्याजवळील दुचाकीची तपासणी केली असता त्याचा गाडीत अनेक चाव्या मिळून आल्या. त्यानुसार त्याने नागपूर शहरातील विविध भागातून १२ दुचाकी वाहने चोरी केल्याचे समोर आले. या दुचाकींसह १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून याच्यावर आधी तीन गुन्हे दाखल होते.
सोलापुरात घरफोडी करणारा आंतरराज्यीय गुन्हेगार अटकेत
सोलापूर : शहरातील सिद्धेश्वर पेठ येथील बंद घराचे कुलूप तोडून घरातील दागिने चोरणाऱ्या आंतरराज्यीय सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अटक करीत शहर गुन्हे शाखेच्या पथकाने ११० ग्रॅम सोन्याचे आणि ११३ ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले. उत्तर प्रदेशातील अनिलकुमार मिस्त्रीलाल राजभर असे अटक केलेल्याचे नाव आहे. दिवसा होत असलेल्या चोऱ्यांमुळे पोलीस चोरट्याच्या शोधात होते. संशयित आरोपीला पुणे नाका ते प्रभाकर महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर युनिटी अपार्टमेंट जवळ सापळा रचून ताब्यात घेतले.