- rat२p४.jpg-
२५N५४९९६
सावर्डे ः विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधताना राज्य समन्वयक समितीचे प्रमुख गिरीश कुळकर्णी.
---
‘स्पर्धा मुल्यांकन समितीची’
सावर्डे विद्यालयाला भेट
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २ ः येथील गोविंदराव निकम माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयाला गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव आयोजित गांधीतीर्थ राज्यस्तरीय स्पर्धेंतर्गत मूल्यांकन समितीने भेट दिली. राज्य समन्वयक गिरीश कुलकर्णी, विश्वजीत पाटील व संजय जाधव यांचा समितीत समावेश होता. विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण व पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांनी मुल्यांकन समितीचे स्वागत केले.
वैयक्तिक, सामाजिक, शारीरिक व मानसिक स्वच्छतेचे महात्मा गांधींचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन गांधी रिसर्च फाउंडेशनकडून केले जाते, असे प्रतिपादन राज्य समन्वयक गिरीश कुळकर्णी यांनी केले. या विद्यालयाने स्वच्छतेविषयक आयोजित पथनाट्य, प्रभातफेरी, गाव पानवठे स्वच्छता, स्मशानभूमी स्वच्छता, प्रार्थनास्थळे स्वच्छता, प्लास्टिकमुक्तीसाठी राबवलेले विविध उपक्रम, समाजात जाणीव जागृतीसाठी आयोजित केलेल्या विविध उपक्रमांबरोबरच प्रसिद्धीसाठी प्रभावीपणे वर्तमानपत्रे व समाजमाध्यमांचा केलेला वापर याबाबत मुल्यांकन समितीने समाधान व्यक्त केले. महात्मा गांधींचे विचार पिढ्यानपिढ्या उपयुक्त ठरावेत म्हणून त्यांनी अंगीकारलेल्या स्वच्छतेविषयक जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी व पर्यावरण रक्षण यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते.