Lovely Professional University : लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा अटकेपार झेंडा, दोन विद्यार्थ्यांना मिळाले कोट्यावधींचे पॅकेज असलेली नोकरी
esakal April 02, 2025 10:45 PM

Lovely Professional University :   जेव्हा विद्यार्थी काही यश संपादन करतात तेव्हा त्यांच्या महाविद्यालयाचेही नाव मोठं होतं. त्यांची शैक्षणिक संस्था, त्यांच्या शिक्षकांचेही कौतुक होतं. याचीच प्रचिती आली आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशामुळे लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एलपीयू) चे नाव चर्चेत आले आहे. 

लव्हली युनिव्हर्सिटीच्या 2025 या नव्या वर्षाची सुरूवात उत्साहाने व भरघोस यशाने झाली आहे. या विद्यापीठात अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना चांगले पॅकेज असलेल्या नोकऱ्या संपादन केल्या आहेत. बी.टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग (ईसीई) अंतिम वर्षाचा विद्यार्थी श्रीविष्णू यांने अग्रगण्य रोबोटिक्स आणि ऑटोमेशन कंपनीत नोकरी मिळवली आहे. त्याला तब्बल 2.5 कोटी रूपयांचे पॅकेज कंपनीने ऑफर केले आहे.

अभिमानास्पद गोष्ट म्हणजे, विष्णूने मिळवलेली ही नोकरी संपूर्ण देशभरातील पदवीधर विद्यार्थ्यासाठी असलेले सर्वाधिक पॅकेज आहे. त्याने भारतीय लँडस्केपमध्ये प्लेसमेंट रेकॉर्ड तोडला आहे. तसेच, आयआयटी, आयआयएम आणि एनआयटीच्या विद्यार्थ्यांना मागे टाकले आहे. तसेच, या विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांनी 10 लाख पगाराच्या नोकऱ्या मिळवल्या आहेत.

केवळ विष्णूच नाही तर ECE च्या शेवटच्या वर्षात शिकणारा बेटीरेड्डी नागा वामसी रेड्डी यांनी रोबोटीक्स ऍन्ड ऑटोसेशन कंपनीत तब्बल 1.3 कोटींचे पॅकेज मिळवले आहे. या दोघांची निवड केवळ या दोघांची नाहीतर लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी तब्बल 1,700 विद्यार्थ्यांची प्लेसमेंटमध्ये MNC मध्ये निवड झाली आहे. ज्यांचे पॅकेज 10 लांखांपासून कोटींच्या घरात आहे.

लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीतील 100 हून अधिक विद्यार्थी सध्या अमेरिका, युके,ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कोटींच्या पॅकेजमध्ये काम करत आहेत. तसेच, इतर पदवीधर विद्यार्थीही आयटी कंपन्यांमध्ये 3 कोटींच्या पॅकेजमध्ये काम करत आहेत. हे तरूण यशस्वी विद्यार्थी अत्यंत कुशल व्यावसायिक तयार करण्याच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीतील शिक्षण आणि त्यांच्या क्षमतेचे उत्तम उदाहरण आहेत.

विद्यापीठातील बी.टेक शाखेमधील 7,361 विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित बहुराष्ट्रीय कंपन्यांसह प्लेसमेंट निश्चित केले आहेत. पालो अल्टो नेटवर्क, न्युटॅनिक्स, मायक्रोसॉफ्ट, सिस्को, पेपल आणि Amazon मेझॉनसह अशा कंपन्यांमध्ये या विद्यार्थ्यांना नोकरी निश्चित केली आहे. यापैकी, टॉप एमएनसीएसने ऑफर केलेले सरासरी पॅकेज 16 एलपीएमध्ये नोंदवले गेले आहे.

मागील शैक्षणिक वर्षातही पालो अल्टो नेटवर्क्ससारख्या उच्चभ्रू कंपन्यांमध्ये लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीतील विद्यांर्थ्यांना 54.75 LPA पॅकेजच्या नोकरी प्रदान केल्या होत्या. यामध्ये नुटानिक्समध्ये 53 LPA, मायक्रोसॉफ्टमध्ये 52.20 LPA अशा एकूण 1,912 एकाधिक नोकरीच्या ऑफर वाढविण्यात आल्या. यामध्ये 377 विद्यार्थांना तीन ऑफर्स, 97 विद्यार्थांना चार, 18 विद्यार्थ्यांना पाच आणि सात विद्यार्थ्यांनी तब्बल सहा नोकरीच्या ऑफर मिळवल्या आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमधील बी.टेक विद्यार्थी, अदिरेड्डी वासू या विद्यार्थांने अविश्वसनीय सात नोकरीच्या ऑफर मिळवून एक दुर्मिळ रेकॉर्ड बनवला आहे. तसेच, या कंपन्यांबरोबरच, Amazon (Rs. 48.64 LPA), Intuit Ltd. (Rs.44.92 LPA) Service Now (Rs.42.86 LPA), CISCO (Rs.40.13 LPA), PayPal (Rs.34.4 LPA), APNA (Rs.34 LPA), Commvault (Rs 33.42 LPA), आणि Scaler (Rs. 32.50 LPA) सारख्या उच्चभ्रू कंपन्या देखील LPU च्या कौशल्य विकास आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावरील शिक्षणावर प्रभावित झाल्या आहेत.

LPU चे पदवीधर विद्यार्थ्यांना त्यांच्या तांत्रिक कौशल्यामुळे कंपनीमध्ये काम देण्यासाठी अनेक कंपन्या उत्सुक आहेत. ज्यामध्ये Accenture, Capgemini, आणि TCS सारख्या प्रमुख कंपन्या आहेत. Capgemini India Pvt. Ltd. ने 736 विद्यार्थ्यांना Analyst आणि Senior Analyst भूमिकांसाठी नियुक्त केले, तर Mindtree ने 467 विद्यार्थ्यांना Graduate Engineer Trainee पदांसाठी नियुक्त केले आहे.

Cognizant Technology Solutions नेही 418 विद्यार्थ्यांना GenC पदांसाठी नियुक्त केले आहे.तर, LPU कडून नियुक्ती करणाऱ्या इतर प्रमुख कंपन्यांमध्ये Accenture (279 विद्यार्थी), TCS (260 विद्यार्थी), KPIT Technologies (229 विद्यार्थी), DXC Technology (203 विद्यार्थी), आणि MPHASIS मध्ये 94 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

रोबोटिक्स आणि ऑटोमेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग यासारख्या मुख्य अभियांत्रिक शास्त्रांमध्ये सर्वात जास्त विद्यार्थांची निवड झाली आहे. ज्यामध्ये उद्योगातील प्रमुख कंपन्या जसे की Palo Alto Networks, Silicon Labs, Trident Group, Nutanix, Autodesk, आणि Amazon यांनी अभियांत्रिकी क्षेत्रांमधून मोठ्या प्रमाणावर भरती केली आहे.

राज्य सभेचे खासदार आणि LPU चे संस्थापक कुलगुरू डॉ. अशोक कुमार मित्तल म्हणाले की, “लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांना वेगाने बदलणाऱ्या जगात यशस्वी होण्यासाठी तयार करण्यासाठी कटिबद्ध आहे. विद्यापीठाचे प्रभावशाली प्लेसमेंट यश हे याचे प्रतिबिंब आहे. ज्यात विद्यार्थ्यांनी टॉप-टियर नोकऱ्या मिळवलेल्या आहेत आणि सातत्याने नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.

EduRevolution उपक्रमाद्वारे, LPU शैक्षणिक शिक्षण आणि वास्तविक उद्योगाच्या अनुभवाचा संगम करून उच्च शिक्षणाची नवी परिभाषा करत आहे. हा परिवर्तनात्मक दृष्टिकोन पारंपरिक शिक्षणाच्या पलिकडे जातो. अशा कौशल्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित करतो जे फक्त विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी तयार करत नाहीत, तर त्यांना स्वत:ची ओळख निर्माण करण्यास सक्षम बनवतात,असेही ते म्हणाले. 

EduRevolution हे शिक्षणाचे भविष्य आकारत आहे, विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी आणि प्रत्येक वर्षी प्लेसमेंट रेकॉर्ड तोडण्यासाठी संधी निर्माण करत आहे, कारण ते जागतिक नोकरी मार्केटमध्ये नेतृत्व करत आहेत, असेही डॉ.मित्तल यांनी सांगितले.

लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये सुरू आहे प्रवेश

एलपीयू येथे 2025 बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख लवकरच येत आहे. एलपीयूमध्ये प्रवेश अत्यंत स्पर्धात्मक आहे. विद्यापीठात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा, तसेच एलपीयूएनएसईस्ट 2025 आणि निवडक कार्यक्रमांसाठी मुलाखत आहे. परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, इच्छुक विद्यार्थी वर भेट देऊ शकतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.