Latest Marathi News Updates : नाशिक शहरात अवकाळी पावसाला सुरुवात
esakal April 02, 2025 11:45 PM
Nashik Live : नाशिक शहरात अवकाळी पावसाला सुरुवात

- नाशिक शहरात अवकाळी पावसाला सुरुवात

- नाशिकला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, संध्याकाळच्या सुमारास शहरातील सर्वच भागात अवकाळीच्या सरी

- ऐन उन्हाळ्यात शहरात अवकाळी पाऊस

- शहरासह जिल्ह्यातील काही भागात देखील अवकाळी पाऊस

- तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

- अवकाळीचा कांदा, द्राक्षासह अन्य पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता

Live : पावसाळ्यात निर्माण होणऱ्या गटाराच्या पाण्याच्या समस्येवरुन नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये झाली वादविवादाची स्थिती

पावसाळ्यात गटाराच्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या समस्येवर नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये झालेली वादविवादाची स्थिती. आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत उपविभागीय अधिकाऱ्यांचा बोलता बोलता अचानक पारा चढला...ते म्हणाले , "जेसीबी आणून तुमची इमारत पाडून टाकतो!"

अधिकाऱ्यांच्या या अजब उत्तराने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला... "इमारत पाडणार म्हणजे काय? शहरातील अनधिकृत बांधकाम पाडा, मग बोला!"

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची भूमिका पळपुटेपणाची - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वक्फ विधेयकाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट असून यामुळे अल्पसंख्यांक आणि मुस्लिमांना त्यांचे हक्क मिळणार आहे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कळंब येथील मनीषा बिडवे हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना नऊ दिवसांची पोलीस कोठडी

- आरोपींचे फोन ताब्यात घेऊन त्याची तपासणी करणे गरजेचे असल्याचा प्रश्न उपस्थित करत सरकारी वकिलांनी प्रस्ताव मांडला.

- या प्रस्तावाला मान्यता देत कळंब सत्र न्यायालयात न्यायाधीश रवींद्र बाटे यांनी दोन्ही आरोपींना नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Fadnvis Live: वक्फ सुधारणा विधेयक निश्चितपणे पास होईल - फडणवीस

-  वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आज लोकसभेत चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी मांडण्यात आलं.

- ही चर्चा झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांशी संवाद साधला.

१०० दिवसांत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न - एकनाथ शिंदे

१०० दिवसांत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहे. त्यांनी २८ विभागांचा बैठकीत आढावा घेतला आहे.

Live : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात तरुणाला पुणे पोलिसांनी केली अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात न्याती ईबोनी सोसायटीजवळ, उंड्री येथे घडला. सुजितकुमार बसवंतप्रसाद सिंग असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी तात्काळ त्या चालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. आजुबाजुचे ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता एक टाटा नेक्सॉन ग्रे रंगाची गाडी घटनास्थळा वरुन जाताना दिसली.

Live : बँक ऑफ महाराष्ट्राच्या अंबरनाथ ब्रांचमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ, अमाराठी मॅनेजरला दिली तंबी

अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये शर्मा नामक अमराठी ब्रँच मॅनेजरने मराठी येत नसल्याचं सांगितल्यावर मनसेने मराठी येत नसल्यास तुमच्या राज्यात जाऊन काम करा, असा इशारा त्यांना दिला. त्यावर या ब्रँच मॅनेजरने हे आमच्या पुण्याच्या मुख्य शाखेला जाऊन सांगा, असं उत्तर दिल्याने संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी ब्रँच मॅनेजरच्या केबिनमध्ये गोंधळ घातला. तसंच बँकेचे व्यवहार मराठीत न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला.

Mumbai: बेस्टच्या ताफ्यात १४० वातानुकूलित बसेस येणार

मुंबईत बेस्टच्या ताफ्यात लवकरच १४० वातानुकूलित बसेसचा समावेश होणार आहे.

Nagpur Live: नागपुराला पावसाने झोडपलं

नागपूर शहरात पाऊस झाला असून अशा अवकाळी पावसामुळे संत्र्यासह फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे.

Kolhapur Live: पट्टणकोडोलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे तणाव

कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. पट्टणकोडोलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्यामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे.

Waqf Bill Live: वक्फ दुरुस्ती विधेयकावर लोकसभेत गोंधळ; किरेन रिजिजू यांच्या भाषणावेळी विरोधकांचा विरोध

लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू असताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी गोंधळ घातला. आज सभागृहात हे विधेयक सादर करण्यात आले असून, त्यावरील तपशील देत असताना विरोधकांनी जोरदार विरोध केला.

Waqf Bill Live: वक्फ सुधारणा विधेयकावर २५ राज्यांमधून सूचना मागवल्या

वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. वक्फ सुधारणा विधेयकावर २५ राज्यांमधून सूचना मागवल्याची माहिती रिजिजू यांनी लोकसभेत दिली.

Waqf Bill in Lok Sabha Live: वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर

 वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर झाले आहे. यावर चर्चा चालू आहे.

Waqf Bill in Lok Sabha Live: वक्फ दुरुस्ती विधेयकावर आम्ही इंडिया आघाडीसोबत आहोत- खासदार सुप्रिया सुळे

वक्फ दुरुस्ती विधेयकावर, NCP-SCP खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...आम्ही इंडिया आघाडीसोबत आहोत आणि इंडिया आघाडी पूर्ण ताकदीने एकत्र राहील."

Alibag Live : अवकाळी पावसामुळे पांढऱ्या कांद्याला फटका

अलिबागमध्ये पांढऱ्या कांद्याच्या काढणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र अवकाळीमुळे पांढऱ्या कांद्याला फटका बसला आहे.

Mumbai Live : खार पोलिसांनी कुणाल कामराच्या शोच्या कॅमेरामनचा जबाब नोंदविला

खार पोलिसांनी कुणाल कामराच्या शोच्या कॅमेरामनचा जबाब नोंदविला असून प्रेक्षकांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदविला जात आहे.

Jalna News : जालन्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

जालन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालंय. घनसावंगी तालुक्यात सकाळी मोठा पाऊस झाला. सरकारने नुकसान भऱपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Ahilyanagar News : बाजरी, ज्वारी पीकासाठी पीककर्ज एकरी ४० हजार रुपये मिळणार

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं बाजरी ज्वारी पीककर्ज मर्यादेत एकरी दहा हजारांची वाढ केलीय. यामुळे एकरी ४० हजार रुपये इतकं पीककर्ज मिळणार आहे.

सगळं अप टू डेट हवं, हे माहिती नाही असं उत्तर चालणार नाही; अजितदादांनी बीडमध्ये अधिकाऱ्यांना सुनावलं

उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर आहेत. दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली असून त्या बैठकीआधी सगळी माहिती तयार ठेवा अशा सूचना अजित पवार यांनी केल्या आहेत. मिटींग सुरू झाल्यावर हे माहिती नाही, ते माहिती नाही असं चालणार नाही. सगळी अपटू डेट माहिती हवी असं स्पष्ट शब्दात अजितदादांनी सांगितलं.

Comedian Kunal Kamra Row : मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला बजावली तिसरी नोटीस

मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला ५ एप्रिल रोजी हजर राहून त्यांचं म्हणणं नोंदवण्यासाठी तिसरी नोटीस बजावली आहे. पोलिसांनी कुणाल कामराला यापूर्वी दोनदा चौकशीसाठी बोलावले होते, परंतु तो हजर राहू शकला नाही.

Washim Rain LIVE : वाशिम जिल्ह्यात मध्यरात्री हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाची हजेरी

वाशिम जिल्ह्यात मध्यरात्री काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, या पावसाचा शेती पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः कांदा बीज आणि हळदीच्या पिकांना फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केलीये.

Ajit Pawar LIVE : उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल, युवकांचा मेळावा होणार

उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीत बीडमध्ये आज युवकांचा मेळावा होणार आहे. त्याचबरोबर बीड जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक देखील अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.

Waqf Amendment Bill LIVE : वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेत सादर होणार, विरोधकांकडून निषेधाची तयारी

नवी दिल्ली : सर्व राजकीय पक्षांशी व्यापक सल्लामसलत केल्यानंतर वक्फ दुरुस्ती विधेयक आज बुधवारी लोकसभेत सादर केला जाईल. आजच ते मंजूर होईल हे जवळजवळ निश्चित आहे. या कालावधीत मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे, कारण अनेक विरोधी पक्ष याच्या बाजूने नाहीत.

Buldhana Accident : शेगाव-खामगाव महामार्गावर भीषण अपघात, 5 जण ठार

बुलढाणा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आलीये. जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आले आहे. तर, वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. खासगी प्रवासी बस एसटी बस आणि बोलेरो या तीन वाहनामध्ये हा भीषण अपघात झाला.

Kolhapur News LIVE : डॉ. सूर्यकांत खांडेकर जन्मशताब्दी वर्षास आजपासून प्रारंभ

कोल्हापूर : प्रसिद्ध कवी स्वर्गीय प्रा. डॉ. सूर्यकांत खांडेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाला उद्या (ता.२) पासून प्रारंभ होत आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तुलनाकार प्रा. डॉ. आनंद पाटील यांचे सायंकाळी सहा वाजता व्याख्यान होणार आहे. ‘कवी प्रा. डॉ. सूर्यकांत खांडेकर यांचे साहित्य आणि सहवास’ या विषयावर ते संवाद साधतील. पेटाळा येथील राम गणेश गडकरी हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत. डॉ. खांडेकर यांनी विविध गीते, कविता, पोवाडे असे विपुल लेखन केले. ‘मराठी पोवाडा’ या विषयात त्यांनी संशोधन करून पीएच.डी. मिळवली. ‘सावली’ व ‘पानफूल’ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून, ‘छुमछुम’ या बालगीत संग्रहाचा राज्य शासनाने उत्कृष्ट बालवाङ्मय पारितोषिक देऊन गौरव केला आहे. ‘हिरे माणके सोने उधळा...,’ हे राजर्षी शाहू गौरवगीतही त्यांच्याच सिद्धहस्त लेखणीतून साकारले. जन्मशताब्दी वर्षात बालगीत ते पोवाडा सादरीकरण, परिसंवाद, मराठी गीतलेखन आदी विषयांवर कार्यक्रम होणार असून, दोन एप्रिल २०२६ रोजी जन्मशताब्दी वर्षाची सांगता होणार आहे.

CPI(M) National Convention LIVE : माकपचे राष्ट्रीय अधिवेशन आजपासून मदुराईला होणार

कोल्हापूर : ‘मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) चोविसावे अखिल भारतीय अधिवेशन मदुराई (तामिळनाडू) येथे २ ते ६ एप्रिलदरम्यान होत आहे. त्यात येत्या तीन वर्षांत राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राचे धोरण काय असावे, याबाबत विचारविनिमय होणार आहे. त्याकरिता कोल्हापूर जिल्ह्यातून मध्यवर्ती समिती सदस्य डॉ. उदय नारकर व प्राचार्य ए. बी. पाटील रवाना झाले आहेत,’ अशी माहिती शहर सचिव विवेकानंद गोडसे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

Shubham Shelke LIVE : महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके आज नोटिसीला उत्तर देणार

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांना देण्यात आलेल्या तडीपार नोटिसीला बुधवारी (ता. २) पोलिस उपायुक्त कार्यालयात उपस्थित राहून उत्तर देण्यात येणार आहे. शहर परिसरातील विविध पोलिस स्थानकांत गुन्हे दाखल आहेत.

Cylinder Rate LIVE : व्यावसायिक सिलिंडर ४४.५० रुपयांनी स्वस्त

मुंबई : सरकारने व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ४४.५० रुपयांनी कमी केल्या आहेत, तर घरगुती सिलिंडरच्या किमतीत मात्र, कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्यावसायिक सिलिंडरची किंमत दिल्लीत ४१ रुपयांनी कमी होऊन १७६२ रुपये झाली आहे, तर मुंबईत सिलिंडरच्या किंमतीत ४२ रुपयांची कपात होऊन ती १७१३.५० रुपये झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

Tilari Ghat LIVE : दोन महिन्यांनंतर तिलारी घाटातून आजपासून एसटी वाहतूक सुरू

चंदगड : कोल्हापूर विभागीय वाहतूक नियंत्रकांनी परवानगी दिल्यामुळे तिलारी घाटातून बुधवार (ता. २) पासून एसटी वाहतूक सुरू होणार आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर एसटी सुरू होत असल्याने सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.

Prashant Koratkar LIVE : प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला, कळंबा कारागृहातील मुक्काम वाढणार

Latest Marathi Live Updates 2 April 2025 : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्ये केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज सहदिवाणी न्यायाधीश एस. एस. तट यांनी फेटाळला. तर, उत्तर प्रदेश सरकार आणि प्रयागराज प्रशासन यांच्या बुलडोझर कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांत ताशेरे ओढताना ही कारवाईच घटनाबाह्य अन् अमानवीय ठरविली आहे. सर्व राजकीय पक्षांशी व्यापक सल्लामसलत केल्यानंतर वक्फ दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत सादर केलं जाणार आहे. कोल्हापूर विभागीय वाहतूक नियंत्रकांनी परवानगी दिल्यामुळे तिलारी घाटातून आजपासून एसटी वाहतूक सुरू होणार आहे. सरकारने व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ४४.५० रुपयांनी कमी केल्या आहेत, तर घरगुती सिलिंडरच्या किमतीत मात्र, कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्यावसायिक सिलिंडरची किंमत दिल्लीत ४१ रुपयांनी कमी होऊन १७६२ रुपये झाली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांना देण्यात आलेल्या तडीपार नोटिसीला आज पोलिस उपायुक्त कार्यालयात उपस्थित राहून उत्तर देण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच भागांत ढगांच्या गडगडाटासह वळवाने हजेरी लावली. पन्हाळा तसेच राधानगरीसह जिल्ह्यातील विविध परिसराला वळवाने झोडपले. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत असून काही भागांत पाऊस पडत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.