मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्फ विधेयकावरून शिवसेना ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र जी, वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा काडीमात्र संबध नाही, ही तुमच्या पक्षाची एक खाज आहे, गोंधळ निर्माण करण्याची! विषय राहुल गांधींचा, त्यांच्या आजीने अमेरिकेला दम भरला होता; आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून फाळणीचा बदला घेतला होता! तुमच्यात हा दम आहे? बोला, असे म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावलं.
Ram Shinde : विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे रस्ता दुरुस्तीला निधी मिळालाअहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी-गिरवली-कवडगाव-अरणगांव यांना जोडणाऱ्या रस्त्याच्या दुरूस्ती कार्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून आता 12.1 किलोमीटर लांबीचा नवीन मार्ग तयार करण्यात येईल आणि त्यामुळे लगतच्या सर्व रहिवाशांना वाहतूक सुविधा प्राप्त होईल. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.
Bihar Vidhan Sabha Election 2025 : महाराष्ट्राप्रमाणेच बिहार विधानसभा जिंकण्याचा अमित शाह यांचा 'प्लॅन'गृहमंत्री अमित शाहांनी बिहारची विधानसभा निवडणूक जिंकण्याची तयारी सुरू केली आहे. भाजप आणि एनडीए घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना काही खास सूचना करताना, बिहारमध्ये भाजपकडून ‘मिशन 225+’चे ध्येय निश्चित करण्यात आलं आहे. अमित शाहांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र मॉडेलचा मास्टर प्लान अवलंबला असल्याची माहिती पुढे येते आहे.
Waqf Amendment Bill : वक्फ सुधारणा विधेयक पास होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा विश्वासराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्फ सुधारणा विधेयकावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आलेलं आहे. हे विधेयक पास होईल. भारतीय संविधानात सेक्युलर शब्दाचे पालन होणार आहे, असं विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. संजय राऊतांच्या प्रश्नावर फडणवीसांनी माझ्या लेव्हलचे प्रश्न घेत चला, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राऊतांवर टिप्पणी केली.
Sadabhau Khot : कर्जमाफी करत राहणे हा शेतीवरचा उपाय नाही; आमदार सदाशिव खोत यांची भूमिकारयत क्रांती संघटनेचे प्रमुख तथा आमदार सदाभाऊ खोत यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन घुमजाव केलं आहे. आजच जे कर्ज आहे ते शेतकऱ्यांच्या चुकीमुळे नाही, तर ते सरकारच्या धोरणांमुळे आहे. या कर्जाची जबाबदारी केंद्राने आणि राज्याने घ्यावी. परंतु कर्जमाफी करत राहणे हा शेतीवरचा उपाय नाही, असे स्पष्ट भूमिका आमदार खोत यांनी घेतली आहे.
Ajit Pawar : आई-बाप अन् चुलत्याच्या कृपेने खूप चांगलं चाललंय; अजितदादांचं बीडमधील विधानानं चर्चाउपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार बीडच्या दौऱ्यावर असून, तिथं त्यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केलं. शाल, हारतुरे किंवा स्मृतीचिन्ह न आणण्याची विनंती केली. काही दिवसांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या कारनाम्यांमुळे अडचणीत आलेल्या नेत्यांवर अप्रत्यक्षपणे भाष्य देखील केलं. आई-बाप अन् चुलत्याच्या कृपेने खूप चांगलं चाललं आहे, त्यामुळे तुम्ही फक्त हात जोडा काही आणू नका, असंही अजित पवार म्हणाले. अजितदादांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Beed News : अजितदादांच्या उपस्थितीत नियोजन मंडळाची बैठक सुरूबीड जिल्हा नियोजन मंडळाची बैठक सुरू झाली आहे. पालकमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे. मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धसही या बैठकीला उपस्थित आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव आमदार धनंजय मुंडे या बैठकीला उपस्थित नसल्याचे सांगितले जात आहे.
Waqf Bill Live : काँग्रेसचा कडाडून विरोधवक्फ सुधारित विधेयकाला काँग्रेसने लोकसभेत कडाडून विरोध केला. या विधेयकावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे विश्वासू खासदार गौरव गोगोई यांनी पक्षाची भूमिका मांडली. त्यांनी सुधारित विधेयकातील अनेक तरतुदींना कडाडून विरोध करताना आधीच्या कायद्यातील तरतुदींचा दाखला दिला. जे मुद्दे आधीच्या कायद्यामध्ये आहेत, तेच मुद्दे मुलामा लावून सुधारित विधेयकात असल्याचा आरोप त्यांनी केली. सरकार केवळ केवा विशिष्ट समाजाला लक्ष्य करण्यासाठी हे विधेयक आणत असल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या भाषणाला विरोधी बाकांवरील सदस्यांना जोरदार दाद दिली.
Beed Farmer Death : बीडमध्ये तरुण शेतकऱ्याची आत्महत्याकर्जमाफीची आशा मावळ्याने एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री बीडच्या गेवराईत घडली. आकाश श्रीराम रोडगे (वय 36) रा.रांजणी ता.गेवराई जि.बीड असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतक-याचे नाव आहे. सदरील शेतक-याने बँक ऑफ महाराष्ट्राचे पत्नी वैशाली रोडगे यांच्या नावे 70 हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. कर्ज भरणा करण्यासाठी बँकेकडून तगादा लावल्याने सद्यपरिस्थितीत पैसे नसल्याने शेतकरी आकाश रोडगे हे मागील आठवड्यापासून चिंतेत होते.
Amit Shah : बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत सादरबहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत सादर झाले आहे. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत हे विधेयक मांडलं. हे विधेयक मांडत असताना लोकसभेत गोंधळ झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुद्धा या विधेयकावर बोलले आहेत. “तुमचा आग्रह होता की, संयुक्त संसदीय समिती बनवा. आमची काँग्रेससारखी समिती नाही, आमची लोकशाहीप्रधान समिती आहे. आमची समिती डोकं चालवते, काँग्रेसच्या जमान्यात कमिटी शिक्का मारायच्या. आमची कमिटी चर्चा करते. चर्चेच्या आधारावर विचार आणि परिवर्तन करते. परिवर्तन स्वीकारायच नसेल, तर मग कमिटी कशाला हवी?” असा सवाल अमित शाह यांनी विचारला.
kiren rijiju : गरज नसलेल्या गोष्टी आम्ही वक्फ कायद्यातून हटवल्यावक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मांडत असताना विरोध गदारोळ करताना दिसत आहेत. गरज नसलेल्या गोष्टी आम्ही वक्फ कायद्यातून हटवल्याचे रिजिजू यांनी म्हटले आहे. यावेळी संसद भवनाच्या जागेवरही वक्फ बोर्डाचा दावा होता, अशी माहिती किरेन रिजिजू यांनी दिली.
Ajit Pawar: कार्यकर्ते, प्रवक्त्यांना दिला मोलाचा सल्लाराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, प्रवक्त्यांनी सगळ्यांनीच तोलून मापून बोललं पाहिजे, असा मोलाचा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते बोलून जातात आणि मीडियाचे लोक आम्हाला त्याबाबत विचारणा करतात. मी माहिती घेतल्याशिवाय बोलत नाही पण आम्हालाही विचारणा होते असे अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी बीड दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना अजित पवारांनी हे वक्तव्य केले आहे.
कार्यकर्ते पक्षात घेताना रेकाॅर्ड तपासा - अजित पवारकार्यकर्ते पक्षात घेताना रेकाॅर्ड तपासा. चुकीच्या लोकांना सोबत घेतलं तर मोठी किंमत चुकवावी लागते. आपल्या आवतीभवती चुकीच्या प्रवृत्तीची लोकं असता कामा नये, अशी सूचना अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना केली.
पाकिस्तान कलाकारांना मनसेचे विरोध, 'अबीर गुलाल' सिनेमाला विरोधपाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या अबीर गुलाल सिनेमाला मनसेने दिला आहे फवाद खान आठ वर्षानंतर बाॅलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. मात्र, मनसेने या फवाद खानच्या सिनेमाला विरोध केला आहे.
Sanjay Raut : वक्फ विधेयकावर आमची भूमिका ठरली - संजय राऊतवक्फ विधेयकावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका ठरली आहे. विरोधात असतानाही आम्ही 370 कलमाच्या विधेयकाला पाठींबा दिला होता. कारण तो राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न होता. आत्ता देखील आमची भूमिका ठरली आहे.ती आम्ही शेवटी कळवू, असे संजय राऊत म्हणाले.
Congress : वक्फ विधेयकाबाबत काँग्रेसची बैठक सुरूवक्फ सुधारणा विधेयक आज दुपारी लोकसभेत मांडले जाणार आहे. या विधेयकाच्या संदर्भात काँग्रेस पक्षाची बैठक सुरू आहे. काँग्रसेचा या विधेयकाला विरोध आहे. विरोधी पक्षांनी सुचवलेल्या दुरुस्तांना या विधेयकात स्थान दिले नसल्याचे काँग्रेसचा आक्षेप आहे.
Buldhana Accident : बुलढाण्यात 3 वाहनांचा विचित्र अपघातबुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. खाजगी प्रवासी बस एसटी बस आणि बोलेरो या तीन वाहनाचा हा भीषण अपघात झाला आहे.
Waqf Board Amendment Bill : वक्फ सुधारणा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर आज 3 राज्यात अलर्टवक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये आज चर्चेसाठी येणार आहे. या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर आज उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र या तीन राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पोलिसांकडून ड्रोन द्वारे लक्ष ठेवलं जाणार. संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Disha Salian Case : दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज पहिली सुनावणीदिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात पहिली सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंड पीठापुढे ही सुनावणी होणार आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी दिशाच्या मृत्यूसाठी आदित्य ठाकरेंना जबाबदार धरत गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे या सुनावणीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.
Ajit Pawar Beed Visit : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावरराज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या आजच्या या दौऱ्यात धनंजय मुंडे गैरहजर राहणार असल्याची चर्चा आहे. प्रकृती ठीक नसल्यानं ते या दौऱ्यात उपस्थित राहू शकत नसल्याचं स्वतः धनंजय मुंडे यांनी ट्वीट करून सांगितलं आहे.
Santosh Deshmukh Murder Case : धनंजय देशमुख घेणार अजित पवारांची भेटमस्साजोगचे दिवगंत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मंगळवारी (ता.01) कळंब पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनिषा बिडवे हत्या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा अशी मागणी त्यांनी केली. तर आज ते बीडच्या दौऱ्यावर येत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत. संतोष देशमुखांचे कळंबमधील कोणत्या महिलेसोबत अनैतिक संबध असल्याचा दिखावा करणार होते? त्या महिलेचा पोलिसांनी शोध घ्यावा ही मागणी धनंजय देशमुख अजित पवारांकडे करणार आहेत
Waqf Board Amendment Bill : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आज लोकसभेत मांडणारमागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणारं वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये बुधवारी चर्चेसाठी येणार आहे. हे विधेयक पास करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी जोर लावला आहे. तर विरोधक देखील या विधेयकाला जोरदार विरोध करण्याच्या तयारीत आहेत. या विधेयकावर आज सभागृहात जवळपास आठ तास चर्चा होणार आहे. त्यामुळे हे विधेयक लागू होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.