SRH vs KKR : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हायव्होल्टेज सामना, जाणून घ्या संपूर्ण रिपोर्ट
GH News April 03, 2025 12:07 AM

आयपीएल स्पर्धा प्रत्येक सामन्यानंतर रंजक वळणावर येत आहे. आता पुढे ही स्पर्धा आणखी तीव्र होत जाणार आहे. प्लेऑफचं गणित सोडवण्यासाठी आता संघांमध्ये चढाओढ होताना दिसणार आहे. असं असताना 15 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ भिडणार आहे. 3 एप्रिल रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर संध्याकाळी 7.30 वाजता होईल. सनरायझर्स हैदराबाद मागचे दोन सामने गमावल्यानंतर कोलकात्यात पोहोचत आहे. तर कोलकाता नाईट रायडर्साही दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.दोन्ही संघांच्या हेड-टू-हेड आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर कोलकाता नाईट रायडर्स संघ वरचढ ठरला आहे. आतापर्यंत या दोन्ही संघात 28 सामने झाले आहेत. यात कोलकात्याने 19, तर हैदराबादने 9 सामन्यात विजय मिळवला आहे.

सनरायझर्स हैदराबादची सर्वाधिक धावसंख्या 228 आहे. तर कोलकात्याची सर्वोच्च धावसंख्या 208 आहे. तर हैदराबादची कोलकाताविरुद्धची सर्वात कमी धावसंख्या ही 113 आहे. दरम्यान ईडन गार्डन्सवर आतापर्यंत 94 आयपीएल सामने झाले आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी येथे 38 वेळा विजय मिळवला आहे. पाठलाग करणाऱ्या संघांनी 56 वेळा विजय मिळवला आहे.ईडन गार्डन्सची खेळपट्टी साधारणपणे फलंदाजांना अनुकूल असते. गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून, ही खेळपट्टी सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत करते. पण, चेंडू जसजसा जुना होत जातो तसतसे फिरकीपटूंना मदत मिळू लागते.

ईडन गार्डन्स हे केकेआरचे होम ग्राउंड आहे. त्यामुळे संघाला निश्चितच फायदा होईल. पण मागच्या सामन्यात खेळपट्टीवरून बराच वाद झाला आहे. दरम्यान हैदराबादचा संघ कोलकात्यापेक्षा मजबूत दिसतोय. कारण, ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेनसारखे मजबूत फलंदाज आहेत. तर गोलंदाजीत पॅट कमिन्स आणि मोहम्मद शमी हे मजबूत वेगवान गोलंदाज आहेत. दरम्यान हवामान खात्याच्या अहवालानुसार, रात्री 11 च्या सुमारास 70 टक्क्यांपर्यंत पावसाची शक्यता आहे. तिथपर्यंत सामन्याचा निकाल लागेल. जर हवामानामुळे सामना थांबवला गेला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.