स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी तिसरी नोटीस पाठवली. ही नोटीस एका प्रकरणाशी संबंधित आहे ज्यामध्ये त्याच्यावर कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. यापूर्वी त्याला दोन नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. परंतू कुणाल कामराने त्यांना प्रतिसाद दिला नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दुसरी नोटीस पाठवून देखील कुणाल कामरा चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर झाला नव्हता. आता त्याला तिसरी नोटीस पाठवण्यात आली आहे. तो आता चौकशीसाठी हजर राहतो की नाही हे पाहणे महत्वाचे ठरेल.
आपल्या एका शोमध्ये काही वादग्रस्त विधाने केल्याचा दावा आहे. ज्यामुळे काही राजकीय पक्षाच्या गटांनी नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पहिल्या दोन नोटिसांना प्रतिसाद न मिळाल्याने आता मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला तिसरी नोटीस पाठवली आहे. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
कुणाल कामरा त्याच्या बेधडक आणि व्यंगात्मक शैलीसाठी ओळखला जातो. यापूर्वीही त्याची अनेक वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणातही त्याच्यावर भावना दुखावल्याचा आरोप आहे. सांगितले की, जर त्याने या नोटिसला प्रतिसाद दिला नाही, तर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.'
दरम्यान, कुणाल कामराने याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. त्याच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, हा तयांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे. तर विरोधकांचे मत आहे की, त्याने मर्यादा ओलांडली आहे. हे प्रकरण आता कायदेशीर वळण घेण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. लवकरच याबाबत स्पष्टता येण्याची अपेक्षा आहे.