RCB vs GT : जोस बटलरची तडाखेदार खेळी, गुजरातचा धमाकेदार विजय, आरसीबीचा 8 विकेट्सने धुव्वा
GH News April 03, 2025 02:06 AM

शुबमन गिल याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने यजमान रॉयल चॅलेंजर्सचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. आरसीबीने गुजरातला विजयासाठी 170 धावांचं आव्हान दिलं होतं. गुजरातने हे आव्हान अवघ्या 2 विकेट्सच्या मोबदल्यात 13 बॉलआधी पूर्ण केलं. गुजरातने 17.5 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 170 धावा केल्या. जोस बटलर आणि साई सुदर्शन या दोघांनी गुजरातच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. तसेच शुबमन आणि शेरफेन रुदरफोर्ड या दोघांनीही बॅटिंगने योगदान दिलं. गुजरातचा हा सलग दुसरा विजय ठरला. तर आरसीबीचा हा या मोसमताील आणि घरच्या मैदानातील पहिला पराभव ठरला.

आरसीबीचा घरच्या मैदानात धुव्वा

गुजरातसाठी विकेटकीपर बॅट्समन जोस बटलर याने सर्वाधिक धावा केल्या. बटलरने 39 बॉलमध्ये 187.18 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 73 रन्स केल्या. बटलरच्या या खेळीत 6 सिक्स आणि 5 फोरचा समावेश होता. तसेच साईचं अर्धशतक अवघ्या 1 धावेने हुकलं. साई सुदर्शन याने 36 चेंडूत 1 सिक्स आणि 7 चौकारांच्या मदतीने 49 धावा केल्या. कॅप्टन शुबमन गिल याने 14 धावांचं योगदान दिलं. तर शेरफेन रुदरफोर्ड याने 18 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 1 फोरसह नॉट आऊट 30 रन्स केल्या. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

आरसीबीची विजयी घोडदौड रोखली

गुजरातने या विजयासह या मोसमातील दुसरा विजय मिळवण्यासह यजमान आरसीबीची विजयी घोडदौडही रोखली. आरसीबीने रजत पाटीदार या नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात सलग 2 विजय मिळवत अप्रतिम सुरुवात केली. आरसीबीकडे गुजरातवर मात करत विजयी हॅटट्रिक करण्याची संधी होती. मात्र गुजरातने आरसीबीवर घरच्या मैदानात मात केली.

आरसीबीचा घरच्या मैदानात पहिला पराभव

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग इलेव्हन : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि यश दयाल.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन : साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, आर साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि इशांत शर्मा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.