खामगाव : खामगाव-शेगाव मार्गावरील जयपूर लांडे फाट्यानजीक बुधवारी पहाटे तीन वाहनांच्या विचित्र अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून १७ जण जखमी झाले.
या दुर्घटनेत तीनही वाहनांचा चुराडा झाला. शेगाव येथून कोल्हापूरला जाणाऱ्या जीपने खामगाव-शेगाव मार्गावरील जयपूर लांडे फाट्यानजीक खामगावकडून परतवाड्याकडे जाणाऱ्या एसटीला जोरदार धडक दिली.
त्याचवेळी एसटीच्या मागून भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्सने जीप व एसटीला धडक दिली.