Ram Navami 2025: सर्वार्थ सिद्धीसोबतच राम नवमीला अनेक शुभ योग तयार होत आहेत, 'हे' उपाय केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होईल
esakal April 03, 2025 09:45 PM

How to Fulfill Wishes on Ram Navami: राम नवमी हा हिंदू धर्मातील महत्वाच्या सणांपैकी एक आहे. असं मानलं जातं की भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला झाला होता. म्हणून, दरवर्षी या तारखेला श्री राम जन्मोत्सव साजरा केला जातो.

श्रीराम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले जातात, जे वाईटाचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर जन्मले होते. यंदा राम नवमी ६ एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी रामाची पूजा करण्यासोबतच, तुम्ही त्यांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी पुढील उपाय देखील करू शकता.

यावेळी रामनवमीच्या दिवशी अनेक शुभ योग निर्माण होणार आहेत. या दिवशी रविवार आहे आणि पुष्य नक्षत्र देखील आहे, म्हणून या दिवशी रवि पुष्य नावाचा शुभ योग तयार होईल.

यासोबतच या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होत आहे. यामध्ये पूजा आणि उपायांनी इच्छा पूर्ण होतात. यासोबतच रामनवमीच्या दिवशी सुललक्ष्मी योग, बुधादित्य राजयोग आणि मालव्य राजयोग देखील उपस्थित राहणार आहेत. 

रामनवमीच्या दिवशी तुम्ही भगवान श्री राम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमानजींची मनोभावे आणि विधिवत पूजा करावी. या दिवशी रामचरितमानस, सुंदरकांड इत्यादींचे पठण करणे शुभ मानलं जातं. रामाची पूजा केल्यानंतर, तुम्ही काही उपाय केले पाहिजेत, ज्यामुळे तुमच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि संपत्ती येईल. 

रामाचे नाव जपणे

रामनवमीच्या दिवशी तुम्ही राम नावाचा जप करू शकता. तुम्ही 'ओम श्रीरामाय नम:' किंवा 'जय श्री राम' या मंत्राचा किमान 108 वेळा जप करू शकता. या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला मानसिक शांती आणि ऊर्जा मिळते.

दानधर्म करा

धर्मात दानधर्माला खूप महत्त्व आहे. या पवित्र दिवशी दान केल्याने त्याचे फायदे आणखी वाढतात. म्हणून, रामनवमीच्या दिवशी तुम्ही गरजूंना दान करा. दान केल्याने तुम्हाला देवाच्या आशीर्वादासह मानसिक शांती मिळते. 

वस्त्र अर्पण

या दिवशी भगवान श्री रामची पूजा करण्यासोबतच त्यांना नवीन कपडेही अर्पण करावेत. असं केल्यानं तुमच्या वैवाहिक आणि प्रेम जीवनात आनंद आणि समृद्धी येते. 

भगवान हनुमानाची पूजा

या दिवशी भगवान श्री रामांचे परम भक्त हनुमानजींची पूजा केल्याने विशेष लाभ मिळतो. या दिवशी तुम्ही हनुमान चालीसा वाचू शकता. हा उपाय केल्याने तुम्हाला श्री राम आणि हनुमान दोघांचेही आशीर्वाद मिळतात. तसेच जीवनातील सर्व समस्या दूर होतात.

संतत्ती प्राप्ती

ज्या जोडप्यांना योग्य मूल हवे आहे त्यांनी दिवशी लाल कापडात नारळ बांधून तो माता सीता आणि श्री राम यांना अर्पण करावा. मान्यतेनुसार हे उपाय तुमच्या इच्छा पूर्ण करते. 

तुळशीचा वापर

रामनवमीच्या दिवशी पाण्यात तुळशीची पाने टाकून स्नान करावे. असं केल्याने तुम्हाला पापांपासून मुक्तता तर मिळतेच पण चांगले आरोग्यही मिळते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.