Maharashtra News Live Updates: पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून दीनानाथ हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस
Saam TV April 04, 2025 04:45 PM
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज दुपारी एक वाजता येणार बीडमध्ये

सावकारी जाचाला कंटाळून एका तरुण व्यापाऱ्याने विष प्राशन करून जीवन संपविले आहे.

घटना बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मंगेश बोबडे असं मयत व्यापाऱ्याचे नाव आहे.

घटना घडून दोन आठवडे उलटत असले तरी पोलिसांनी अद्याप कसलीच कारवाई केली नाही. न्याय मिळावा यासाठी पीडित कुटुंब पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या उंबऱ्या झिजवित आहे.

सावकारी जाचातील आरोपी सर्वच राजकीय आहेत त्यामुळे पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज या कुटुंबाची भेट घेणार आहेत

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून दीनानाथ हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस

महानगरपालिका आरोग्य प्रमुख नीना बोराडे पाठवणार नोटीस

आरोग्य उपसंचालकाने स्थापन केलेल्या चार सदस्य समितीत निना बोराडे यांचा समावेश

झालेला प्रकाराचा खुलासा दीनानाथ हॉस्पिटलकडून महानगरपालिका मागवणार

Pune News: दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणी आरोग्य उपसंचालक राधाकिसन पवार करणार चार समितीय सदस्यांची नियुक्ती

चार सदस्य समिती करणार दीनानाथ हॉस्पिटलची चौकशी

यामध्ये एक स्त्री रोग तज्ञ यांचा समावेश

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या आरोग्य उपसंचालकांना फोनवरून सूचना

समिती स्थापन करून करणार दिनानाथ हॉस्पिटलची आज पाहणी

राधाकिसन पवार यांच्या अहवालावरून दीनानाथ वरती केली जाणार कारवाई

Nandurbar Unseasonal Rain: नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

सातपुडा परिसरात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी....

अवकाळी पावसामुळे सातपुड्यातील कैरी उत्पादक शेतकरी अडचणीत....

मुसळधार पावसामुळे हरभरा, गहू आणि मका दादर या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, दादर पिकाचेही नुकसान....

वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे उडाले पत्रे.....

महिला मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर विहिरीत कोसळले, नांदेड जिल्ह्याच्या आलेगाव शिवारातली घटना

हिंगोली जिल्ह्यातील महिला मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात घडला आहे.

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावातील ह्या शेतकरी महिला मजूर होत्या, ट्रॅक्टर मध् बसून या महिला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळले.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू करत दोन महिला सह एका पुरुषाला वाचवले आहे.

मात्र अद्याप ही आठ जण विहिरीत बुडाले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.असून हिंगोली सह नांदेड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत, धक्कादायक म्हणजे या विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालेले असल्याने विहिरीमध्ये ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला.

बचाव कार्य सुरु असून पाणी जास्त असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे.

सातबारा कोरा कुठंय? पायथान काढून विचाराच, राजू शेट्टींचा सरकारला इशारा

राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येण्यापूर्वी, तेव्हा शेतकऱ्यांना मोठं आश्वासन दिलं गेलं

संपूर्ण पिक कर्जमाफी आणि सातबारा कोरा मात्र प्रत्यक्षात काहीच झालं नाही.

त्यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी थेट सरकारला लक्ष्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्याचं आवाहन केलं आहे.

आणि लाव रे तो व्हिडिओ म्हणत देवेंद्र फडणवीस यांची क्लिप सभेत वाजवून दाखवली.

मुख्यमंत्री आता सहा तारखेला वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी कारंजा इथं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं.

आता शेतकऱ्यांनी त्यांच्या पायातील पायथान काढून त्यांना विचारलं पाहिजे – आमचं कर्ज कधी माफ होणार?"

संत रूपालाल महाराज पुण्यतिथी सोहळा, 22 हजार भाविकांची हजेरी, अंजनगाव सुर्जी शहरात पालखी मिरवणूक रंगली

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील आराध्य दैवत असलेले राष्ट्रसंत रुपालाल महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता करण्यात आली..

या पुण्यतिथी सोहळ्याला 22 हजार भाविकांनि उपस्थिती लावली होती..

रूपालाल महाराजांचा पालखी सोहळा अंजनगाव शहरातून रथाची ढोल,ताशे,दिंड्या, टाळ मृदुंगाच्या गजरात विविध धार्मिक वेशभूषांसह संपूर्ण शहरातून शोभायात्रा काढण्यात आली..

निरोप मार्ग सर्व भाविकांनी सुशोभित केला होता..

शोभा यात्रेनंतर काल्याचे किर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला.. यावेळी पोलिसांचा चौक बंदोबस्त पाहायला मिळाला..

राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांची कान्होजी जेधे यांच्या वंशज यांना धमकी

वंशज आहात म्हणून तुम्हाला मुळशीतून जाऊ देतो अन्यथा मुळशीतून जाऊ दिलं नसतं

आमदार शंकर मांडेकर यांनी फाडलं निवेदन घेऊन गेलेले पत्र

निवडणूक काळात तुम्ही माझं काम केलं नाही असं सांगत आमदार शंकर मांडेकरांनी जेधेला सुनावलं

जेधे वाढण्यासाठी निधी मिळावा यासाठी शिफारस पत्र मागण्यासाठी गेले होते जेधे

आमदार शंकर मांडेकर यांची केली अजित पवारांकडे जेधेनी तक्रार

पुण्यातील सूसमधील घनकचरा प्रकल्प तातडीने बंद करा, चंद्रकात पाटील यांचा महापालिकेला इशारा

सूस येथील घनकचरा प्रकल्पामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबतच्या तक्रारींवरून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी महापालिका प्रशासनाला सज्जड दम भरला.

"सूस येथील घनकचरा प्रकल्प आजच बंद करा, अन्यथा या प्रकल्पाविरुद्ध खुर्ची टाकून बसावं लागेल,' असा इशारा पाटील यांनी दिल्यानंतर महापालिका प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.

प्रकल्प बंद केल्यास तेथे येणारा कचरा जिरवायचा कुठे ? असा प्रश्न महापालिकेकडून उपस्थित करण्यात आला आहे.

सूस येथील घनकचरा प्रकल्पामध्ये दररोज १५० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. संबंधित प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो.

मागील दोन वर्षांपासून नागरिकांकडून हा प्रकल्प अन्यत्र हटविण्याची आग्रही मागणी केली जात होती. दरम्यान, हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद करून तो नांदे-चांदे येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय जानेवारी २०२४ मध्ये झाला होता.

या बैठकीत पाटील यांनी संबंधित कचरा प्रकल्प तातडीने बंद करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या. त्यावेळी, प्रकल्पाच्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुधारणा करण्यात आले आहे.

प्रकल्प स्थलांतरित करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जागा ताब्यात आली नाही, त्यामुळे स्थलांतर रखडले असून त्यावर लवकरच कार्यवाही केली जाईल, असे प्रशासनाकडून पाटील यांना सांगण्यात आले.

हा प्रकल्प नियमांची पूर्तता करूनच सुरू केला असल्याने तो बंद करणे शक्य होणार नाही.प्रकल्प बंद केल्यास त्याचे मोठा भार महापालिकेवर पडणार आहे. प्रकल्पाबाबतच्या तक्रारी असतील, तर प्रत्यक्षात जागेवर जाऊन पाहणी करण्याची विनंती पाटील यांना केली जाईल.

Pune: पुण्यात महसूल विभागाची आज आणि उद्या कार्यशाळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या राज्य सरकारच्या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी आज आणि उद्या पुण्यात दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळेला राज्यातील सर्व विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत महत्त्वाचे महसूल अधिकारी ही हजेरी लावणार..

बालेवाडी येथील हॉटेलमध्ये ही कार्यशाळा आयोजित

सकाळी १० वाजता कार्यशाळा उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार..

लोणावळा- मळवली विभागातील रेल्वे मार्गावर उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी 3 दिवस काही तासांचा ब्लाॅक

येत्या दि. ६ ते ८ एप्रिल रोजी दुपारी दीड ते तीन तासांपर्यंत हा ब्लाॅक घेण्यात येणार आहे.

त्यामुळे पुढील तीन दिवस पुढीलप्रमाणे रेल्वे गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

त्यामध्ये एक्सप्रेस गाड्या नियमित करण्यात आल्या असून, लोकल ट्रेन शाॅर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत

Maharashtra Politics: ठाकरे गटसह प्रहार, मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदेगटात पक्षप्रवेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात आभार सभेत दरम्यान ठाकरेगट, प्रहार आणि मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केलाय.

ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गजानन डोमाळे आणि तालुका प्रमुख संजय रंगे यांनी पक्ष प्रवेश केल्याने शिंदेगटाची ताकत वाढणार असल्याचे बोलल्या जात आहेत.

सोयाबीनच्या दरात वाढ, तब्बल सहा महिन्यानंतर दर 4600 रुपयांवर

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचं पहायला मिळालं असून तब्बल सहा महिन्यानंतर सोयाबीनने ४ हजार ६०० रुपयांचा टप्पा गाठलाय.

वाशिमच्या बाजारात सोयाबीनला ४३०० ते ४६०० रुपये येव्हढा दर मिळाला तर ३३०० क्विंटल आवक झाली होती.

सोयाबीनचा नवीन हंगाम सुरू झाल्यावर ऑक्टोबर महिन्यापासून दरात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. अगदी तीन हजार आठशे रुपयापर्यंत दर खाली आले होते.

मात्र आता पुन्हा दरात वाढ होत असल्यानं शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळण्याची आशा निर्माण झालीये.

लातूरच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाचा फटका, आंबा फळबागेचं मोठं नुकसान

लातूर शहरासह ग्रामीण भागात काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेती पिकांसह ,आंबा फळबागेच मोठ नुकसान झाल आहे...

जिल्ह्यातल्या रेनापुर तालुक्यातील पळशी शिवारात मागच्या तीन दिवसापासून होणाऱ्या वादळी वारा आणि अवकाळी पावसाने 3 एकर वरील केशर आंबा फळबागेच मोठे नुकसान झाला आहे त्यामुळे शेतकरी मदतीच्या अपेक्षा करत आहे..

Palghar: पालघर शहरात चार चाकी वाहनांच्या बॅटरी चोरणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट

पालघर शहरात सध्या चार चाकी वाहनांमधील बॅटरी चोरणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय .

महिनाभरात 50 पेक्षा अधिक कार , जेसीबी , डंपर , बस यांच्या बॅटरी चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत .

पालघर शहरासह परिसरातील भागांमध्ये या चोरट्यांनी सध्या धुमाकूळ घातला असून यामुळे चार चाकी वाहन मालक , जेसीपी आणि ट्रकचे मालक यांच्यामध्ये भीतीच वातावरण पाहायला मिळते .

मागील अनेक दिवसांपासून या चार चाकी वाहन मालकांकडून पालघर पोलिसांकडे तक्रार दिली असून सुद्धा पोलिसांच्या हाती याबाबत काहीच धागेदोरे लागत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .

तर रात्रीच्या सुमारास पोलीसगस्त वाढवून या चोरट्यांच्या मुस्क्या आवळाव्या अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

रायपूर जहागीर शेत शिवारातील पाच एकर शेतातील बांबू जळून खाक, शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान

अमरावती जिल्ह्यातील असदपूर अंतर्गत येणाऱ्या मौजे रायपूरच्या शेत शिवारात असलेल्या संजय तापडिया यांच्या पाच एकर शेतात असलेल्या बांबू, स्प्रिंकर पाईप, इतर शेती साहित्य शॉक सर्किट मुळे जळून खाक झाले आहे.

शेतकरी संजय तापडिया यांनी २०२१ मध्ये बांबू शेतीची लागवड केली होती,

शेतात असलेल्या महावितरणच्या डीपी मध्ये अनेक दिवसापासून शॉर्टसर्किट होत होता त्याची तक्रार देखील तापडिया यांनी केली,

महावितरण कडे अनेक वेळा तक्रारी देऊन दुरुस्ती केली नाही असा आरोप तापडिया यानी केला,

महावितरणच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पाच एकर शेतामध्ये लागवड केलेला बांबू जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवल्या जात आहे

सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय आणि नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी संजय तापडिया या शेतकऱ्यांनी केली आहे,

Dharashiv: उमरगा येथे जिल्ह्यातील पहीले डिजिटल क्युआर कोड लायब्ररी असलेले तहसील कार्यालय

धाराशिव जिल्ह्यातील पहिले डिजिटल QR Code लायब्ररी असलेले तहसील कार्यालय म्हणून तहसील कार्यालय उमरगाची नोंद करण्यात आली आहे.

सात कलमी कृती कार्यक्रमाच्या अंतर्गत कार्यालयीन सोयी सुविधा/नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत या डिजिटल लायब्ररीची स्थापना करण्यात आली आहे.

या लायब्ररीचे उद्घाटन तहसीलदार गोविंद येरमे यांच्या हस्ते करण्यात आले.

तर या उपक्रमाचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी देखील कौतुक केले.

Ulhasnagar: उल्हासनगरात गादीच्या कारखान्याला भीषण आग

उल्हासनगरच्या शांतीनगर रस्त्यावर असलेल्या सोलापूर गादी कारखान्याला गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागली.

या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झालं असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय.

या दुकानात मोठ्या प्रमाणात कापड आणि कापूस असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केलं.

उल्हासनगर महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Sangali: वक्फ बोर्ड बिलाआडून देशातील मुस्लिम समाजाला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न, सांगलीतील मुस्लिम समाजाचा आरोप

वक्फ बोर्ड बिला आडून देशातील मुस्लिम समाजाला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजपा सरकार करीत असल्याचा आरोप सांगली जिल्ह्यातील मुस्लिम समाजाकडून करण्यात आला आहे.

वक्फ बोर्डाच्या जमिनीवर सरकारचा डोळा असून या जमिनी काढून घेऊन मुसलमानांना आर्थिक दृष्ट्या पुन्हा मागे नेण्याचे कारस्थान भाजपा सरकार करत असल्याचा आरोप करत वक्फ सुधारणा बिलाला विरोध दर्शवला आहे.

तसेच दिल्लीमधून याबाबत जे आंदोलन पुकारण्यात येईल त्यानुसार आंदोलन किंवा पुढील भूमिका घेतली जाईल, असे मुस्लिम समाजाच्यावतीने पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले आहे.

Sangali: सांगलीच्या वाळवा आणि जत तालुक्यात सुसाट्याच्या वाऱ्या सह अवकाळी पावसाची हजेरी

सांगली जिल्ह्यातील जत आणि वाळवा तालुक्यात वारणा पट्ट्यात सायंकाळी सुसाट्याच्या वाऱ्यासह विजेच्या गडगडासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे..

यामुळे उन्हाळी भुईमूग गहू हरभरा शाळू मळणी काढणीचे काम रखडले आहे..

वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे काहीकाळ जण जीवन विष्कळीत झाले होते. जत तालुक्यात ही बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली होती.

महावितरणची जालना जिल्ह्यात धडक कारवाई, २ दिवसांत दीडशेहून अधिक वीजचोरांना दणका

महावितरणने जालना जिल्ह्यात वीजचोरांविरोधात धडक मोहीम उघडली आहे.

मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील भरारी पथकांसह स्थानिक कार्यालयांनी 1 आणि 2 एप्रिल रोजी परतूर आणि मंठा तालुक्यात केलेल्या कारवाईत तब्बल 154 वीजचोऱ्या पकडल्या आहेत.

एकाच वेळी वेगवेगळ्या पथकांनी केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.

दरम्यान महावितरने जालना जिल्ह्यातील मंठा आणि परतुर तालुक्यात केलेल्या कारवाईत 154 जणांनी 1 लाख 34 हजार युनिट जवळपास 32 लाखांची वीज चोरी केल्याचं समोर आलं आहे...

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.