आयपीएल 2025 सुरू होण्याआदी आर. अश्विननं, 'ऐश की बात' या युट्यूबवरील त्याच्या हिंदी शोमध्ये पंजाबच्या संघाचं विश्लेषण केलं होतं.
अश्विन म्हणाला होता, "आयपीएलमध्ये माझं विशेष लक्ष तरुण फलंदाज प्रियांश आर्यावर असेल. कारण तो वेगळा वाटतो."
त्यावेळेस चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या अश्विनने कदाचित कल्पना केली नसेल की ज्यावेळेस पंजाबविरुद्ध सामन्यात तो आर्याला बॉलिंग करेल तेव्हा हा फलंदाज गगनचुंबी षटकार ठोकत 10 बॉलमध्ये 28 धावा करेल.
अश्विन, रविंद्र जडेजा आणि नूर अहमदसारख्या फिरकी गोलंदाजींचं त्रिकूट असो किंवा खलील अहमद आणि मथीसा पथिराना सारखे जलदगती गोलंदाज असोत, 24 वर्षांच्या आर्यानं त्यांच्या गोलंदाजीच्या ठिकऱ्या उडवल्या.
प्रियांशनं केलेलं तडाखेबंद शतक हे आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही भारतीय फलंदाजानं केलेलं दुसरं वेगवान शतक आहे.
त्यानं 39 चेंडूंमध्येच शतक झळकावलं.
आयपीएलमध्ये प्रियांशपेक्षा वेगवान शतकं आणखी तीन फलंदाजींनी केली आहेत. हे फलंदाज म्हणजे,
या सामन्यात प्रियांश आर्याच्या धडाकेबाज फलंदाजीची कल्पना या गोष्टीवर येऊन शकते की पंजाबच्या सहा प्रमुख फलंदाजांनी 0, 9, 4, 9 आणि 1 धावा केल्या.
दुसऱ्या टोकाला सातत्यानं फलंदाज बाद होत असतानादेखील प्रियांश आर्याच्या फलंदाजीतील आक्रमकपणा कमी झाला नाही.
प्रियांशनं 39 चेंडूंमध्ये तुफानी शतक ठोकलं, मात्र त्याला युसूफ पठाणनं 37 चेंडूंमध्ये केलेल्या शतकाचा विक्रम मोडता आला नाही.
मात्र प्रियांशला या गोष्टीचा नक्कीच अभिमान असेल की युसूफ पठाणनं दोन वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर हा विक्रम केला होता. त्याउलट प्रियांश आर्यानं अजून फक्त दिल्लीसाठीच खेळण्यास सुरूवात केली.
आर्याची क्षमता सर्वात आधी दिल्लीचे प्रशिक्षक संजय भारद्वाज यांनी ओळखली होती.
जवळपास एक दशकाआधी जेव्हा मी गंभीर आणि अमित मिश्राची मुलाखत घेण्यासाठी अशोक विहारमधील क्रिकेट अकॅडमीमध्ये गेलो होतो.
तेव्हा भारद्वाज एका तरुण खेळाडूकडे इशारा करत म्हणाले होते, "आता मला वीरूसारखं खेळणारा (वीरेंद्र सेहवान) फलंदाज मिळाला आहे. जो चेंडू पाहतो आणि थेट हवेत भिरकावतो."
आयपीएलमध्ये आर्यासाठी कोट्यवधींची बोलीप्रियांश आर्या एका मध्यम वर्गीय कुटुंबातील आहे. त्याचे आईवडील सरकारी शाळेत शिक्षक आहेत. गेल्याच वर्षी आयपीएलमध्ये जोरदार बोली लावत आर्याला करारबद्ध करण्यात आलं होतं.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आयपीएलचा लिलाव होण्याच्या एक दिवस अगोदर सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध सामना होता.
त्या सामन्यात समोर भुवनेश्वर कुमार आणि पीयूष चावला सारखे अनुभवी गोलंदाज असतानादेखील आर्यानं 43 चेंडूंमध्ये 102 धावा ठोकल्या होत्या. मग त्याचा परिणाम असा झाला की आयपीएलच्या लिलावात आर्यासाठी लावलेली बोलीदेखील गगनाला भिडली.
पंजाबच्या संघानं आर्यासाठी 3.8 कोटी रुपये मोजले. त्याआधी देखील दिल्ली प्रीमियर लीगमधील एका सामन्यात एकाच षटकात सहा षटकार लगावून आर्या चर्चेत आला होता.
ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टीरक्षक फलंदाज आणि उप-कर्णधार ब्रॅड हॅडिन पंजाबचे सहाय्यक प्रशिक्षक आहेत.
मंगळवारी (8 एप्रिल) खेळण्यात आलेल्या एका सामन्याच्या टीव्ही प्रसारणाच्या वेळेस त्यांनी एक रंजक कहाणी सांगितली.
ते म्हणाले, "पहिल्या सराव सामन्याच्या वेळेस पहिले आठ चेंडू खेळतानाच आर्यानं चार षटकार लगावले. तिथेच आम्हा लोकांच्या लक्षात आलं की हा मुलगा विशेष आहे."
पंजाबचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंग यांनीदेखील यंदाचा हंगाम सुरू होण्याआधीच आर्याच्या चांगल्या भवितव्याची आशा व्यक्त केली होती.
आयपीलएल सुरू होण्याआधीच न्यू चंदीगडमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत आर्याचं कौतुक करणारे पॉंटिंग त्याआधी इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते, "तरुण खेळाडूंमध्ये मी एक वैशिष्ट शोधतो, ते म्हणजे चेंडू फटकावण्याची क्षमता. प्रियांश खूप सफाईनं चेंडू फटकावतो."
काय आहे आर्याच्या फलंदाजीचं वैशिष्ट्यं?प्रियांश आर्यानं चार सामने खेळूनच फक्त पॉंटिंगच नाहीतर त्याचे पहिले प्रशिक्षक संजय भारद्वाजसह अनेक सहकारी खेळाडू आणि माजी खेळाडूंचं त्याच्याबद्दल मत योग्य ठरवण्याच्या दिशेनं कामगिरी करून दाखवली आहे.
अलीकडच्या दशकात दिल्लीनं वीरेंद्र सेहवाग, शिखर धवन, गौतम गंभीर आणि विराट कोहलीसारखे दिग्गज फलंदाज देशाला दिले आहेत.
मात्र नाण्याची दुसरी बाजू ही देखील आहे की दिल्ली क्रिकेटमध्ये उन्मुक्त चंदसारखे प्रतिभावान खेळाडू सुरुवातीला मिळालेल्या यशानंतर पुढची मजल मारू शकले नाहीत.
आर्यासमोरचं आव्हान पुढचा विराट कोहली किंवा वीरेंद्र सेहवाग बनवण्याचं नाही, तर त्याची पावलं जमिनीवर घट्ट राहून, सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखवण्याचं आहे.
प्रियांश आर्यानं 42 चेंडूंमध्ये केलेल्या 103 धावा आणि शशांक सिंहनं केलेल्या नाबाद 52 धावांच्या जोरावर पंजाबच्या संघानं चेन्नईच्या संघाविरोधात 20 षटकांमध्ये सहा गडी गमावत 219 धावा केल्या.
चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला, आयपीएलच्या गेल्या पाच हंगामांमध्ये कधीही 180 पेक्षा जास्त धावांचं लक्ष्य गाठण्यात यश आलं नव्हतं.
यावेळेस पंजाबच्या संघाविरुद्ध चेन्नईच्या संघानं 200 धावा नक्कीच गाठल्या. मात्र सामना जिंकण्यात त्यांना अपयश आलं.
चेन्नईच्या संघातून ड्वेन कॉनवेनं सर्वाधिक 69 धावा केल्या. शिवम दुबेनं 42 धावा केल्या. तर एमएस धोनीनं 12 चेंडूंमध्ये 27 धावा केल्या.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.