Maharashtra News Live Updates: लाखवड गावातील 40 गावांना जोडणारा रस्त्याचे काम बंद पाडल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त
Saam TV April 18, 2025 03:45 PM
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात महिन्याभरापूर्वी दाखल झालेल्या १२३ नव्या सीएनजी बस सदोष

या बसची सेवा संचलनातून बंद करण्यात आली आहे.

सर्व बस संबंधित कंपनीकडे माघारी पाठविण्यात आल्या

बसमधील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतरच त्या मार्गांवर सोडण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला

हडपसर, नतावाडी, शेवाळवाडीसह अन्य डेपोंमधून या बसचे संचलन सुरू होते.

मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून या बस सेवेतून काढून टाकण्यात आल्या

Maharashtra Politics: लाखवड गावातील 40 गावांना जोडणारा रस्त्याचे काम बंद पाडल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त

लाखवड या गावातील ग्रामीण मार्ग क्रमांक 139 या मुख्य रस्त्याच्या कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी मंजूर करून दिलेला होता.

परंतु गावातील काही लोकांनीच या रस्त्याला विरोध करत या रस्त्याचे काम बंद पाडले.

आज एकनाथ शिंदे यांना या रस्त्यावरच्या कामाचे बाबत निवेदन देण्यासाठी ग्रामस्थ त्यांच्या दरे गावी आले होते.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट एसपी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना फोन करूनच या रस्त्याचे काम बंद पाडणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामजयंती महोत्सवाला प्रारंभ

मोझरी गावातुन निघाली मानवसेवा छात्रालयाच्या विद्यार्थ्यांच्या पथकांची शोभायात्रा..

ग्रामजयंतीच्या निमित्ताने मोझरी गावात विविध धार्मिक,सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन...

रविवारी महाकाला व काल्याचे कीर्तन.

दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती; राज्यात नव्या ६५ बाजार समित्यांना मंजुरी

संचालक मंडळाच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच राज्य शासनाने राज्यातील २१ जिल्ह्यांत ६५ नवीन बाजार समित्या मंजूर केल्या आहेत.

यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती मंजूर करण्यात आली आहे.

सोलापूर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून,या बाजार समितीचे कार्यक्षेत्र उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर हे दोन तालुके आणि सोलापूर शहर हद्दवाढ भागातील १५ विकास संस्थांचा समावेश आहे.

या बाजार समितीची निवडणूक सुरू असतानाच राज्य शासनाने राज्यातील २१ जिल्ह्यांत नवीन ६५ बाजार समित्यांना मंजुरी दिली आहे.

यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती मंजूर करण्यात आली आहे.राज्यात अगोदर ३०५ बाजार समिती आणि ६२५ उपबाजार कार्यरत आहेत.

Sujat Ambedkar : सुजात आंबेडकर आज हिंगोलीत मृत्युमखी पडलेल्या महिलांच्या कुटुंबीयांना भेटणार

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर आज हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावात दाखल होणार आहेत,

शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या सात महिला मजुरांचा ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने मृत्यू झाला होता या महिलांच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत

दरम्यान राज्य शासनाने घोषणा करून देखील या महिलांच्या कुटुंबीयांना मदत मिळत नसल्याच्या तक्रारी आंबेडकर यांच्याकडे नातेवाईकांनी केल्या होत्या

या संदर्भात सुजात आंबेडकर प्रशासनाला जाब देखील विचारणार आहेत

गुलाबराव महाराज यांचं नाव मुंबईतील एशियाटिक लायब्ररीला द्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री,घटना समितीचे सदस्य व अमरावतीचे सुपुत्र डॉ. पंजाबराव देशमुख यांचं नाव अमरावती विमानतळाला देण्याची मागणी अमरावती जिल्ह्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील यांनी केली,

90 टक्के लोकांची भूमिका आहे की डॉ.पंजाबराव देशमुख यांचे नाव मिळालं पाहिजे मला विश्वास आहे की पंजाबराव देशमुख यांचे नाव अमरावती विमानतळाला मिळेल तर गुलाबराव महाराज यांचं नावं मुंबईतील एशियाटिक लायब्ररीला देण्यात यावे

या लायब्ररीमध्ये गुलाबराव महाराज गेले होते तिथे कसे पुस्तकालावे तसं त्यांना सांगितलं होतं, अमरावती मंत्राला नाव देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे,

अमरावती जिल्हा हा पंजाबराव देशमुख यांचा म्हणून ओळखला जातो तर विमानतळाला पंजाबराव देशमुख यांचे नाव नाही दिलं तर जनताच सरकारला उत्तर देणार आहे. कारण 90 टक्के लोकांची इच्छा आहे असा इशारा मनसेचे पप्पू पाटील यांनी दिला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शेतीची फळझाडांची पाहणी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे या गावी सुट्टीसाठी आले आहेत.

नेहमीप्रमाणे गावी आल्यानंतर त्यांनी गावात केलेल्या शेतीची पाहणी केली.

जनावरांच्या गोठ्यात जाऊन जनावरांना चारा खाऊ घातला.

गावी आल्यानंतर प्रत्येक वेळी एकनाथ शिंदे हे शेतीत रंगलेले आपल्याला पाहायला मिळाले आहेत.

तसेच यावेळी सुद्धा सफरचंद,आंबा,बांबू अशा अनेक झाडांची त्यांनी लागवड केलेली असल्याने सध्याच्या या उन्हाळ्यामध्ये झाडांची काय परिस्थिती आहे त्याचे त्यांनी स्वतः शेतात जाऊन पाहणी केली

Jalgaon: ग्रामपंचायंतीच्या भ्रष्ट कामाची चौकशी करा, ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरु

जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथील ग्रामपंचायती प्रत्येक कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय त्या विरोधात ग्रामपंचायती समोर ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरु केले आहे..

घरकुल योजनेचा लाभ भूमिहीनाना सोडून श्रीमंत व्यक्तींना देणे, गावातील विकास कामे फक्त कागदावर पूर्ण व त्याची लाखो रुपयाची बिले काढून मोकळे, अश्या मनमानी कारभरा विरोधात जळगावजामोद तहसीलदाराकडे अनेक तक्रारी केल्या गेल्या

मात्र अद्याप कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायती समोरच आमरण उपोषण सुरु केले आहे..

जो पर्यंत ग्रामसेवका वर कारवाई होत नाही तोपर्यन उपोषण सोडणार नसल्याचा इशारा उपोषणकर्त्याने दिला आहे

येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रेत एसटीला ४० लाखांवर उत्पन्न

येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा याञेत एसटी महामंडळाच्या धाराशिव विभाग कार्यालयाला ४० लाखांवर उत्पन्न मिळाले आहे.

येडेश्वरी याञेसाठी १३० बसच्या १ हजार ९७१ फेऱ्या झाल्या असुन यामध्ये १ लाख ९ हजार १२३ महीला व पुरुषांनी प्रवास केलाय येडेश्वरी देवीच्या यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या वतीने ज्यादा बसचे नियोजन करण्यात आले होते

भाविकांना योग्य सेवा मिळावी कोणतीही गैरसोय होवु नये यासाठी जिल्ह्यातील सर्वच आगारातून ज्यादा बस सुरू केल्या होत्या.

Yavatmal: पार्टटाइम जॉबच्या नावाखाली सव्वासहा लाखांनी फसवणूक

पार्ट टाइम जॉब देण्याच्या नावाखाली तब्बल सहा लाख 32 हजारांनी फसवणूक केल्याची घटना यवतमाळ शहरातील उमरसरा परिसरात उघडकीस आली असून याप्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात निशांत लाभणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रिया सनियाल या तरुणीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक करणाऱ्या तरुणीची शोध पोलिस घेताहेत.

Akola: अकोल्यात दुर्मीळ 'अल्बिनिझम' पांढऱ्या चिमणीचं दर्शन

अकोल्यातल्या मुर्तिजापूरात दुर्मीळ पांढऱ्या चिमणीचं दर्शन झालंये..

मूर्तिजापूरातील राजुरा घाटे येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या परिसरात ही दुर्मीळ पांढऱ्या रंगाची चिमणी दिसून आलीये..

या दुर्मीळ पक्ष्याचे निरीक्षण शाळेतील पक्षीमित्र मनोज लेखनार यांनी केले.

लेखनार हे गेले चार वर्षे शालेयमध्ये चिमणी संवर्धनाचे कार्य करत आहेत. दरम्यान, ही पांढरी चिमणी अर्थातच 'अल्बिनो हाऊस स्पॅरो' असून, तिच्या शरीरातील मेलॅनिन या रंगद्रव्याचा पूर्ण अभाव असल्याने ती पूर्णतः पांढरी दिसतेये..

अकोलेकरांना 5 दिवसानंतर होणार पाणीपुरवठा, काटेपुर्णा प्रकल्पातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती 26.21 टक्के

अकोलेकरांना आता तब्बल पाच दिवसानंतर पाणीपुरवठा होणारेय.

अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पाची पाणी पातळी कमी झाल्याने महापालिकेने हा निर्णय घेतलाय.

10 दिवसांपूर्वी अकोला शहराला 3 दिवसाआड पाणीपुरवठा होत होताय. गेल्याच आठवड्यात महापालिकेने चार दिवसानंतर पाणीपुरवठा करण्याचा निर्णय अंमलात आणला होताय.

मात्र, दिवसेंदिवस कमी होणारी पाणी पातळी पाहता महापालिकेने काल 16 एप्रिलपासून तब्बल 5 दिवसानंतर अकोलेकरांना पाणी देण्याचा निर्णय घेतलाय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.