Nandurbar Accident: नंदुरबारमध्ये भीषण अपघात; घाटात वळण घेताना धुळे-सूरत बस उलटली
Saam TV May 06, 2025 06:45 AM

नंदुरबारमध्ये धुळे- सूरत बसचा भीषण अपघात झालाय. कोंडाईबारी घाटाच्या वळणावर बस उलटली असून यात २० ते २५ प्रवाशी जखमी झाले आहेत. बसचा अपघात पहाटे ६ वाजेच्या दरम्यान घडलाय. वळणावरून उलटून बस घाटाच्या खालच्या रस्त्यावर कोसळली.

नवापूरहून दोन रुग्णवाहिका आणि विसरवाडीहून एक रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झालीय. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. अपघातग्रस्तांना नवापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी करण्यात दाखल करण्यात आली. (बातमी अपडेट होत आहे)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.