Farmers News : शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, पाणंद रस्त्यांबाबत मोठे आदेश
Saam TV May 06, 2025 06:45 AM

Maharashtra farm road encroachment : महाराष्ट्रात शेत आणि पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला गती मिळणार आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेदरम्यान सुरळीतपणे काम व्हावे यासाठी पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचे आदेश गृह विभागाच्या संमतीने जारी करण्यात आले आहेत.

शेतमाल वाहतुकीसाठी अत्यावश्यक असलेल्या या रस्त्यांचा विकास व्हावा, यासाठी नियोजनबद्ध मार्गदर्शक सूचनाही जारी झाल्या आहेत. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील रस्ते सुधारणा आणि शेतकऱ्यांच्या सोयीसाठी मोठे पाऊल पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या या निर्णायाचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता पाणंद रस्ते विकास होण्याच्या मोहिमेला वेग येणार आहे.

शेत व पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण काढताना व मोहीम राबवताना पोलिस बंदोबस्त द्यावा असे आदेश शासनानं दिले आहेत. गृह विभागाच्या संमतीनं हे आदेश निर्गमित करण्यात आले असून, शेतमाल वाहतुकीसाठी महत्त्वाच्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेसाठी सुरळीत पोलीस बंदोबस्त असावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यानंतर नियोजन विभागाने २७ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना काढल्या आहेत. यानुसार पोलीस यंत्रणेमार्फत बंदोबस्त पुरवण्यात यावा, असेही आदेशात नमूद आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.