Maharashtra Live Updates : 'वक्फ'मधील तरतुदींना स्थगिती हा कोणाचा विजय पराजय नाही -अजित पवार
Sarkarnama April 18, 2025 03:45 PM
'वक्फ'मधील तरतुदींना स्थगिती हा कोणाचा विजय पराजय नाही -अजित पवार

संसदेत मंजूर वक्फबोर्ड सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयानं सात दिवसांची स्थगिती दिली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरद्वारे आपले मत मांडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकार आणि वक्फ बोर्ड दोघांनाही बाजू न्यायालयासमोर भक्कमपणे मांडण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेली स्थगिती ही कुठल्या एका बाजूचा विजय किंवा दुसऱ्या बाजूचा पराजय नसून, भारतीय राज्यघटनेतील तरतूदींचं काटेकोर पालन व्हावं, यासाठी सर्वोच्च न्यायालयानं घेतलेली काळजी आहे. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालय जो अंतिम निर्णय देईल, त्यानंतरच यासंदर्भात भाष्य करणं योग्य ठरेल,

रणजित कासलेला अटक

वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरचा प्लॅन असल्याचा धक्कादायक दावा करणाऱ्या रणजित कासलेला बीड पोलिसांनी अटक केली आहे. आज पहाटे पोलिसांनी त्याला ताब्यत घेतले. सरेंडर होण्यासाठी कासले काल रात्री पुण्यात आला होता.

Raj Thackeray VS ashish shelar : राज ठाकरेंनी अभ्यासपूर्ण बोलावं - आशिष शेलार

पहिलीपासून हिंदी विषयाच्या सक्तीला राज ठाकरे यांनी विरोध केला आहे. ही सक्ती खपवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. राज ठाकरेंच्या या इशाऱ्यावर मंत्री आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, राज ठाकरे यांनी अभ्यासपूर्ण बोलावं. त्यांना राष्ट्रीय शिक्षण धोरण याची कॉपी आम्ही जरूर पाठवू माझी अपेक्षा आहे ते आणि त्यांचे सहकारी याचा अभ्यास करतील..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.