Maharashtra Politics Live : फुले चित्रपटावर आक्षेप घेत असाल तर 'सेन्सॉर'ची मानसिकता लक्षात येते - जयंत पाटील
Sarkarnama April 10, 2025 07:45 PM

काश्मीर फाईल्स, केरला फाईल्स सारख्या propoganda based फिल्म्सवर सेन्सॉर बोर्ड कोणताही आक्षेप घेत नाही. मात्र "फुले" सारख्या चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे. Who is Namdeo Dhasal? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेन्सॉर बोर्डात किती विद्वान लोकं बसतात याची कल्पना आली होती. पण आता "फुले" चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे. त्यातून सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते, असे ट्विट जयंत पाटलांनी केले आहे.

लाडक्या बहिणांना एप्रिलचा हफ्ता अक्षय तृतीयेला मिळणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हफ्ता कधी मिळणार याची माहिती समोर आली आहे. 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे. त्याच दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मदत भिसे कुटुंबाने नाकारली

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेवर उपचार मिळू न शकल्याने गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गर्भवती महिलेच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली होती. मात्र ती मदत भिसे कुटुंबियांनी नाकारली आहे.

Eknath Shinde : शरद पवारांच्या आमदाराकडून एकनाथ शिंदेंच्या स्वागताची तयारी

मोहोळचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू खरे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या स्वागतासाठी जाहिरात दिली आहे. ही जाहीरात सध्या चर्चेचा विषय बनली आहे. सांगोल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी एकनाथ शिंदे सोलापूर जिल्ह्यात येणार आहेत. यानिमित्त आमदार राजू खरे त्यांचे जाहिरातीने स्वागत केलं आहे.

Maharashtra Govt : राज्यातील मंत्र्यांसाठी आयपॅड खरेदी

मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी मंत्री, सचिवांसाठी आयपॅड खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हिमाचल प्रदेशप्रमाणेच राज्यातही 'ई-कॅबिनेट' सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात सध्या मंत्रिमंडळ बैठकीच्या आदल्या दिवशी सायंकाळी मंत्रिमंडळ बैठकीची विषयपत्रिका आणि प्रस्तावांच्या टिपणी मंत्री आणि सबंधित सचिवांना पाठविल्या जातात. मात्र, हा तपशील माध्यमापर्यंत पोहोचत असल्याने आता ई-कॅबिनेट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Tariff War : चीनने अमेरिकेवर लादला 84 टक्के वाढीव आयात कर

डोनाल्ड ट्रम्प यांनी आणलेल्या टॅरिफ धोरणाचा अनेक देशांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे आता अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध आणखी तीव्र झालं आहे. कारण अमेरिकेने चीनवर 104 टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा केल्यानंतर आता चीननेही अमेरिकन वस्तूंवर 84 टक्के वाढीव आयात कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही देशांत आता व्यापार युद्ध भडकल्याचं पाहायला मिळत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.