जिंका, तुम्ही लखनौमध्ये आहात! मुंबईची आज लखनौविरुद्ध अटीतटीची लढत, रोहित आणि पंतच्या फटकेबाजीवर साऱ्यांचे
Marathi April 04, 2025 11:24 AM

पहिले दोन सामने गमावणाऱ्या मुंबईने सोमवारी वानखेडेवर आपल्या विजयाचे खाते उघडले. या विजयामुळे मुंबई संघात उत्साहाचे वातावरण  पसरले होतेच पण मुस्कुराइए आप लखनऊ में हैं असे स्वागत करणाऱ्या नवाबी शहरात मुंबईने विजयाचा धमाका करायलाच हवा, अशी अपेक्षा तमाम क्रिकेटप्रेमींची आहे. मुंबई संघ आता लखनौत आहे, त्यामुळे तेथे जिंकाच असा आग्रह सर्वांनी धरलाय.

मुंबई संघात पहिल्या दोन सामन्यांत उत्साहाचा अभाव जाणवत होता. मात्र वानखेडेवर पहिले पाऊल ठेवताच मुंबई संघात अचानक नवचैतन्य संचारले आणि त्यांनी वानखेडेवर कोलकात्याचा सहज पराभव केला. पदार्पणवीर गोलंदाज अश्वनी कुमारच्या माऱ्याने मुंबईच्या गोलंदाजीला अनोखी अश्वशक्ती दिली.  लखनौविरुद्धही ही शक्ती पुन्हा एकदा मुंबई संघात दिसेलच, पण मुंबईसाठी सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो दिग्गज फलंदाजांच्या अपयशी कामगिरीचा.

रोहितच्या फॉर्मची साऱ्यांनाच काळजी

मुंबईला प्रत्येक सामन्यागणिक नवनवे हिरे सापडत आहेत. आधी विघ्नेश पुथुर सापडला, मग अश्वनी कुमारने दणक्यात पदार्पण केले. एकीकडे नवीन गोलंदाज मुंबईची ताकद वाढवत असताना फलंदाजीत मात्र दिग्गज माती खाताहेत. यात पहिला क्रमांक लागतोय रोहित शर्माचा. त्याच्या बॅटमधून धावांचा झरा आटल्यामुळे मुंबईची फलंदाजी कमकुवत झालीय. सूर्यकुमार,तिलक वर्मा, विल जॅक्स यांच्या अपयशामुळे मुंबईला फार मोठी धावसंख्याही अद्याप उभारता आलेली नाही. पहिले तीन सामने पाहता फलंदाजी हा मुंबईसाठी फार चिंतेचा विषय आहे.

गोलंदाजीच खरे आकर्षण

मुंबई आणि लखनौत एक समानता आहे. दोन्ही संघांचे गोलंदाज भन्नाट खेळ दाखवताहेत. एकीकडे पुथुर, अश्वनी या गोलंदाजांनी पदार्पणातच साऱ्यांना धक्के दिले आहेत, तर लखनौच्या शार्दुल ठाकूर, आवेश खान, दिग्वेश राठी यांनी प्रतिस्पर्ध्यांना चांगलेच सतावलेय. दोन्ही संघांत गोलंदाजीचे नवे टॅलेंट भरभरून दिसताहेत. हेच दोन्ही संघाचे खरे आकर्षण आहेत.

लखनौला काळजी पंतची

रोहितप्रमाणे ऋषभ पंतची काळजी लखनौला आहे. लखनौचे निकोलस पूरन हे वादळ सातत्याने घोंगावतेय, सोबतीला एडन मार्करम, मिचेल मार्श, डेव्हिड मिलर या परदेशी खेळाडूंची ताकद लखनौच्या डावाला लाभलीय, पण या झंझावातात ऋषभ पंत मागे पडलाय. हिंदुस्थानचा हा धडाकेबाज फलंदाज अक्षरशः खचल्यासारखा खेळतोय. पहिल्या तिन्ही सामन्यांत त्याने 0, 15, 2 अशा निराशाजनक खेळी केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीपासून अचानक संघाबाहेर गेलेला पंत आयपीएलमध्येही गायब आहे. त्याला आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी लखनौत उद्या धमाका करावाच लागणार आहे.

संभाव्य उभय युनियन

मुंबई रोहित शर्मा, रायन रिक्ल्टन (यशक्रक्षक), सूर्यकुमार यादव, टिळ वर्मा, हार्दिक पांड्या (कर्नाधर), नामन धार, मिशेल सॅन्टोर, दीपक चार, ट्रेंट बोल्ट, अश्वानी कुमार, विघ्नेश पुतूर, मुजिब.

लखनौ एडन मार्करम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार-यष्टिरक्षक), आयुष बदोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, दिग्वेश राठी, आकाश दीप, रवी बिष्णोई, एम. सिद्धार्थ.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.