नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
आर्थिक निर्णय मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रवास सुखकर होतील.
एखादी गुप्त वार्ता समजेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.