उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी घेणे सर्वात महत्वाचे असते. कारण यामुळे त्वचा निरोगी राहते. तसेच, उन्हाळ्यात अंगावर पुरळ, घामोळे येणे आणि लालसरपणा येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर बर्फ वापरू शकता. मात्र बर्फ थेट चेहऱ्यावर लावू नये. तो एखाद्या कापडात गुंडाळून चेहऱ्यावर लावावा. यालाच आईस फेशियल देखील म्हटले जाते. बर्फ वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतो. आइस फेशियलसाठी तुम्ही चेहऱ्यावर बर्फ किती प्रकारे लावता येऊ शकतो ते आजच्या या लेखातून जाणून घेऊयात.
तुम्ही काकडीच्या रसानेही तुमचे आइस फेशियल करू शकता. यासाठी तुम्हाला एका भांड्यात काकडीचा रस काढून घ्यावा लागेल. नंतर तो एका बर्फाच्या ट्रेमध्ये ओता. ते फ्रीजमध्ये गोठण्यासाठी ठेवा. जेव्हा ते व्यवस्थित गोठले जाईल तेव्हा ते बाहेर काढा आणि कापडाच्या मदतीने चेहऱ्यावर याचा मसाज करा. ते गोलाकार पद्धतीने पसरवून तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. अशाप्रकारे चेहऱ्यावरील लालसरपणा कमी होईल. शिवाय चेहराही हायड्रेटेड राहील.
तुम्ही चेहऱ्यावर गुलाबपाणी लावून आईस फेशियल देखील करू शकता. यासाठी तुम्हाला पाण्यात गुलाबजल मिसळून ते बर्फाच्या ट्रेमध्ये ओतावे लागेल. ते सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. यानंतर ते तुमच्या चेहऱ्यावर लावा. हे लावल्याने पूर्वी असलेला लालसरपणा कमी होईल. तसेच, उष्णतेचा तुमच्या चेहऱ्यावर होणारा परिणामही कमी होईल. तुम्ही हे तुमच्या चेहऱ्यावर दररोज देखील लावू शकता. यामुळे चेहऱ्याचे हायड्रेशन टिकून राहील.
बर्फ थेट त्वचेवर लावू नये. यामुळे तुमची त्वचा जळू शकते.
एका वेळी 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ आईस फेशियल करू नका. यामुळे त्वचेवर लालसरपणा येऊ शकतो .
बर्फाने फेशियल करण्यापूर्वी एकदा तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या.
जर तुम्हाला हे फेशियल ट्राय करायचे असेल तर ब्युटिशियनकडून टेक्निकचे शिक्षणही नक्कीच घ्या. कारण याच्या मदतीने तुम्ही त्वचेवर योग्य पद्धतीने फेशियल करू शकाल.
हेही वाचा : पारंपारिक रागी अंबिल रेसिपी: नाच्नीचे अंबिल
संपादित – तनवी गुडे