ब्रेन स्ट्रोक ही एक अतिशय धोकादायक स्थिती आहे. त्याला सेरेब्रल पाल्सी असेही म्हणतात. कधीकधी ही परिस्थिती इतकी गंभीर होते की ती एखाद्याचा जीवही घेऊ शकते. आपल्या चुकीच्या सवयी ब्रेन स्ट्रोकसाठी जबाबदार असू शकतात. याकरताच आपण आपल्या मानसिक आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. आपला मेंदू निरोगी ठेवण्यासाठी आपण काही निरोगी सवयी अंगिकारणे गरजेचे आहे.आज या लेखात आपण जाणून घेऊयात अशा काही निरोगी सवयींबद्दल ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यात अंगीकारल्यास ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी करता येऊ शकेल. ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय आणि आपण त्याचा धोका कसा कमी करू शकतो ते पाहूयात.
जेव्हा मेंदूतील रक्ताभिसरणात अडथळा येतो तेव्हा त्याला ब्रेन स्ट्रोक म्हणतात. कधीकधी कोणत्याही प्रकारच्या दुखापतीमुळे रक्ताभिसरणाच्या नसा तुटतात किंवा फुटतात, ज्यामुळे ब्रेन स्ट्रोक होतो.
उच्च रक्तदाब हे ब्रेन स्ट्रोकचे सर्वात मोठे कारण आहे. जर तुमचा रक्तदाब 140 /90 किंवा त्याहून अधिक राहिला तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तो नियंत्रित करा. व्यायाम, कमी मीठयुक्त आहार आणि जास्त ताण न घेणे यामुळे रक्तदाब सामान्य राहण्यास मदत होते.
जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्हाला तुमच्या साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण सतत वाढणे रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकते, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.
धूम्रपान केल्याने रक्तदाब वाढू शकतो. यामुळे मेंदूला पुरेसे रक्त मिळत नाही. त्याचप्रमाणे, जास्त मद्यपान केल्याने देखील स्ट्रोकचा धोका वाढतो.
तुमच्या रोजच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करावा ज्यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतील. धान्य, फळे, भाज्या, ओमेगा-3 समृद्ध अन्न (जसे की मासे किंवा जवस बियाणे)हे मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
दररोज किमान 30 मिनिटे चालणे किंवा हलका व्यायाम करावा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हृदय तसेच मेंदू निरोगी राहतो.
जास्त काळ ताणतणावात राहिल्याने तुमच्या मेंदूला गंभीर नुकसान पोहोचू शकते. ध्यान, योग, संगीत किंवा तुमच्या आवडत्या कामाच्या तसेच छंदांच्या माध्यमांतून तुम्ही तुमचा ताण कमी करू शकता.
उत्तम आरोग्यासाठी सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे, झोप आपल्या मेंदूसाठी देखील खूप महत्वाची आहे. झोपेचा अभाव हृदय आणि मेंदू दोघांवरही परिणाम करतो.
हेही वाचा : Mantra : अंघोळ करताना म्हणा हा मंत्र, होतील दुर्लभ लाभ
संपादित – तनवी गुडे