- अवकाळी पावसामुळे महावितरणच्या सातपूर फिडरमध्ये बिघाड
- निम्म्याहून अधिक शहराचा सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत
- महावितरणच्या सातपूर फिडरवरील दुरुस्तीच्या कामासाठी गंगापूर धरण पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा बंद
- दुपारी 12 ते संध्याकाळी उशिरापर्यंत अनेक भागात कमी दाबाने होणार पाणीपुरवठा
Chhatrapati Shahu Terminus LIVE : कोल्हापूर ते कटिहार विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस रविवारपासूनकोल्हापूर : छत्रपती शाहू टर्मिनसवरून दर रविवारी कोल्हापूर ते कटिहार (बिहार) विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू होत आहे. तिची पहिली फेरी येत्या रविवारी (ता. ६) सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार आहे. उन्हाळी सुटीत उत्तर भारतात जाणाऱ्या बिहारवासीयांसाठी ही एक्स्प्रेस सुरू केली आहे. केवळ उन्हाळी सुटीच्या ६ ते २७ एप्रिल या कालावधीत ती धावणार आहे.
Shah Nawaz Malik Resigns LIVE : नितीश कुमार यांना धक्का; वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर होताच JDU अल्पसंख्याक प्रदेश सचिवाचा राजीनामावक्फ दुरुस्ती विधेयकाबाबत पक्षाच्या भूमिकेमुळे JDU अल्पसंख्याक प्रदेश सचिव शाह नवाज मलिक यांनी पक्ष आणि इतर पदांचा राजीनामा दिलाय. "आमच्यासारख्या लाखो भारतीय मुस्लिमांचा असा अढळ विश्वास होता, की तुम्ही पूर्णपणे धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे ध्वजवाहक आहात. पण, आता हा विश्वास तुटला आहे. वक्फ विधेयक दुरुस्ती कायदा २०२४ बाबत JDU च्या भूमिकेमुळे लाखो भारतीय मुस्लिम आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे," असे पत्रात म्हटले आहे.
देशभक्तीपर चित्रपटांसाठी आणि 'भारत कुमार' या टोपणनावासाठी ओळखले जाणारे भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले.
मिरज : पोलिसांच्या कारवाईत जप्त करण्यात आलेला अवैध दारूसाठा नष्ट करण्यात आला. महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याने विशेष मोहीम राबवून ही कारवाई केली. नऊ गुन्ह्यांत जप्त केलेला ३८ हजार ४०० रुपये किमतीचा सुमारे ११० लिटर दारूसाठा नष्ट करण्यात आला.
Shaktipeeth Highway LIVE : 'शक्तिपीठ'प्रश्नी उद्या उपमुख्यमंत्री शिंदेंना रोखणार, शक्तिपीठविरोधी संघर्ष समितीचा इशाराकोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शक्तिपीठ महामार्ग रद्द करतो व शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो, असे आश्वासन देणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती सरकारने घुमजाव केला आहे. त्यामुळे शनिवारी (ता. ५) कोल्हापूर दौऱ्यात त्यांच्यासमोर कुणाल कामराचे गाणे लावून त्यांना रोखले जाईल, असा इशारा आज शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीतर्फे आज येथे देण्यात आला. शासकीय विश्रामगृह येथे संघर्ष समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
Prajwal Revanna LIVE : माजी खासदार प्रज्वल रेवण्णाला न्यायालयाचा आणखी एक धक्काबंगळूर : अत्याचार प्रकरणात तुरुंगात असलेला माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याला न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. बंगळूरमधील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने प्रज्वल रेवण्णा याची अत्याचाराचा खटला रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. अत्याचार प्रकरणाची सुनावणीही नऊ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. के. आर. नगर अत्याचार प्रकरणात पीडित महिलेची कोणतीही भूमिका नाही. त्यामुळे प्रज्वल याच्या वकिलाने त्यांना खटल्यातून काढून टाकण्यासाठी याचिका दाखल केली होती. ही याचिका लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने फेटाळून लावली. त्याचवेळी, न्यायाधीशांनी आरोपींवरील आरोपांवर भर दिला. आरोप वाचून दाखवले जात असताना न्यायाधीशांसमोरच प्रज्वल याने अश्रू ढाळल्याची घटना घडली.
Waqf Bill LIVE : 'वक्फ' विधेयकावर संसदेची मोहोर; राज्यसभेतही मध्यरात्री दोननंतर 128 विरुध्द 95 मतांनी विधेयक मंजूरLatest Marathi Live Updates 4 April 2025 : बहुचर्चित वक्फ दुरुस्ती विधेयक अखेर संसदेमध्ये मंजूर झाले असून, आज मध्यरात्री वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेनेही त्यावर मान्यतेची मोहोर उमटविली. तब्बल बारा तासांपेक्षाही अधिक काळ चाललेल्या चर्चेनंतर हे विधेयक राज्यसभेत १२८ विरुध्द ९५ मतांनी मंजूर करण्यात आले. तसेच अवघ्या जगाचे लक्ष ज्याच्याकडे लागले होते त्या अमेरिकेच्या बहुचर्चित जशास तसे आयातशुल्क धोरणाची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यानंतर जागतिक अर्थकारणाला मोठे हादरे बसले. जगभरातील बहुतांश शेअर मार्केटमध्ये मोठी घसरगुंडी पाहायला मिळाली. राज्यात सर्वच पिकांसाठी खरीप हंगामापासून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारशी सामंजस्य करार करण्यात येणार असून देशात असा प्रयोग करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शक्तिपीठ महामार्ग रद्द करतो व शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो, असे आश्वासन देणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती सरकारने घुमजाव केला आहे. त्यामुळे शनिवारी (ता. ५) कोल्हापूर दौऱ्यात त्यांच्यासमोर कुणाल कामराचे गाणे लावून त्यांना रोखले जाईल, असा इशारा शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीतर्फे देण्यात आला. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत असून काही भागांत पाऊस पडत असून पिकांचे नुकसान होत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..