Maharashtra Politics live : प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर 7 एप्रिलला सुनावणी
Sarkarnama April 04, 2025 07:45 PM
Manikrao Kokate : लवकरच नंदुरबारला जाणार

दोन महिले उलटले तरी नंदुरबारचे पालकमंत्री असलेले राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे नंदुरबार दौऱ्यावर गेले नाहीत. त्यामुळे नंदुरबारचे पालकमंत्री हरवले की काय अशी चर्चा जिल्ह्यात होती. त्यावर माध्यमांनी प्रश्न केला असता मी लवकरच नंदुरबारला जाणार आहे. अधिवेशन मध्ये असल्याने मला जाता आले नाही अशी माहिती कोकाटे यांनी दिली आहे.

congress : शिवसेनेनंतर आता काँग्रेसचे आंदोलन

पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने वातावरण तापले आहे. आमदार गोरखे यांचे पीए असलेले संतोष भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. दिनानाथ रुग्णालयानं रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली होती, असा आरोप देखील करण्यात आला आहे आहे. त्यानंतर शुक्रवारी शिंदे व ठाकरेंच्या शिवसेनेने आंदोलन केले तर पतीत पावन संघटनेने रुग्णालयाच्या फलकाला काळे फासले आहे. आता काँग्रेसनेदेखील आक्रमकपणे आन्दोलन सुरु केले आहे. त्यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या ट्रस्टीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत आंदोलन केले आहे.

Shivsena : पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी शिवसेनेने केले आंदोलन

पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने वातावरण तापले आहे. आमदार गोरखे यांचे पीए असलेले संतोष भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. दिनानाथ रुग्णालयानं रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली होती, असा आरोप देखील करण्यात आला आहे आहे. त्यानंतर शुक्रवारी शिवसेनेने आंदोलन केले तर पतीत पावन संघटनेने रुग्णालयाच्या फलकाला काळे फासले आहे.

Pune Live: दीनानाथ रुग्णालयाच्या बाहेर शिवसैनिक आक्रमक

गर्भवती महिलेल्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर शिवसैनिकांचे आंदोलन सुरु आहे. ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यक्रर्ते आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी दोन्ही गटातील शिवसैनिकांना रोखलं आहे.

Mumbai Police : मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट; पोलिस बंदोबस्तात वाढ

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट कायम आहे. मुंबई शहरात दहशतवादी हल्ल्याच्या शक्यता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे मुंबईतील पोलिस यंत्रणा अँक्टीव्ह मोडवर आली आहे. मुंबई पोलिसांनी याबाबतचं परिपत्रक काढत याबाबतची माहिती दिली आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

Waqf Amendment Bill :'वक्फ'च्या विरोधात काँग्रेसची कोर्टात धाव

काँग्रेस वक्फ (दुरुस्ती) विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आले. त्याला काँग्रेसने आडकाठी घातली आहे. काँग्रेस त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

Devendra Fadnavis Live: फडणवीस यांची क्लिप सभेत वाजवली...

सातबारा कोरा कुठंय? असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी थेट सरकारला लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न विचारा, असे आवाहन त्यांनी केले आहे. 'लाव रे तो व्हिडिओ'शेट्टींनी देवेंद्र फडणवीस यांची क्लिप सभेत वाजवली. आमचं कर्ज कधी माफ होणार? असे फडणवीस यांना विचारा, असे शेट्टी यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

Manoj Kumar passes away : भारतीय सिनेसृष्टीतील महान युगाचा अंत ःअजित पवार

ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका महान युगाचा अस्त झाला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Manoj kumar : ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन

देशभक्तीपर चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले आणि 'भारत कुमार' म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे वयाच्या 87 व्या वर्षी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले.

Nagpur Crime News : नागपुरात भर बाजारात गोळीबार

नागपूर शहराच्या मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोधनी परिसरातील प्रकाशनगरमध्ये भर बाजारात गोळीबाराची घटना घडली आहे. अवैध धंद्यांच्या वादातून हा गोळीबार झाल्याचं सांगितलं जात आहे. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक ग्राहक जखमी झाला आहे.

Waqf Amendment Bill : लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर

लोकसभेनंतर आता राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. सभापती जगदीप धनखड यांनी मध्यरात्री 2 वाजून 32 मिनिटांनी याबाबतची घोषणा केली. राज्यसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर आता ते राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येणार आहे. राष्ट्रपतींच्या सहीनंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.