आज सोन्याची किंमत नवी दिल्ली : सोन्याच्या दरात आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाल्यानं गुंतवणूकदारांना फायदा झाला. तर, विविध कारणांसाठी सोन्याचे दागिने नागरिकांकडून खरेदी करावे लागतात. वाढत्या किमतीमुळं सोने खरेदीदारांवरील दबाव वाढला होता. अमेरिकेतील मॉर्निंगस्टारच्या एका अनालिस्टनं येत्या काळात सोन्याचे दर 38 टक्क्यांनी घसरतील अशी भविष्यवाणी केली आहे.
आज देशांतर्गत बाजारात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 90000 रुपये आहेत. जागतिक बाजारात सोन्याचे दर 3100 डॉलर प्रति आौंस इतके आहेत. यामध्ये जवळपास 40 टक्के घसरण होण्याची शक्यता असल्यानं भारतीय बाजारात सोन्याचे दर जवळपास 10 ग्रॅमसाठी 55000 रुपयांवर येऊ शकतात. मॉर्निंगस्टारचे रणनीतीकार जॉन मिल्स यांच्या अंदाजानुसार सोन्याची किंमत 3080 डॉलर प्रति औंसवरुन 1820 डॉलर प्रति औंसवर येतील. म्हणजेच सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.
सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांमध्ये मोठी वाढ झाली होती. आर्थिक अनिश्चितता, महागाईची भीती, राजकीय तणाव, अमेरिकन टॅरिफची भीती यामुळं गुंतवणूकदारांनी सुरक्षित मार्ग म्हणून सोन्याची दर वाढली आहे. आता काही कारणांमुळं सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळू शकतं.
सोन्याचे दर घसरण्याचं प्रमुख कारण म्हणजे पुरवठा वाढला आहे, सोन्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. 2024 च्या दुसर्या तिमाहीत खाणकामामुळं होणारा नफा 950 डॉलर प्रति औंस इतका झाला आहे. सोन्याचा जागतिक साठी 9 टक्क्यांनी वाढून 2,16,265 टन झाला आहे. ऑस्ट्रेलियानं सोन्याचं उत्पादन वाढवलं आहे. रिसायकल सोन्याचा पुरवठा देखील वाढला आहे. केंद्रीय बँकांनी गेल्या वर्षी 1045 टन सोन्याची खरेदी केली होती,त्यांच्याकडून मागणी कमी केली जाऊ शकते. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या एका सर्व्हेनुसार 71 सेंट्र्ल बँकांनी सोन्याचा साठा कमी करणे किंवा जितका साठा आहे तितका कायम ठेवण्याचं नियोजन करण्यात येत आहे.
दरम्यान, भारतात सोन्याच्या दरात आज 1600 रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळाली. सोन्याच्या दरानं 90 हजारांचा टप्पा ओलांडलेला आहे. जरी मॉर्निंगस्टारच्या एका तज्ज्ञानं सोन्याचे दर घसरणार असल्याचं सांगितलं असलं तरी सर्व तज्ज्ञांनी याबाबत सहमती दर्शवलेली नाही. सोन्याच्या दरातील वाढ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या टर्मचा पदभार स्वीकारल्यानंतर वेगानं झाली आहे. आता भारतात सोन्याचे दर एक लाखांच्या जवळ पोहोचले आहेत.
अधिक पाहा..