उन्हाळा विशेष रेसिपी थंडगार Beetroot Buttermilk
Webdunia Marathi April 04, 2025 08:45 PM

साहित्य-
दही
बीट
थंड पाणी
कोथिंबीर
पुदिना पाने
जिरे
तूप
आले
हिरवी मिरची
बर्फ
ALSO READ:
कृती-
सर्वात आधी बीट स्वच्छ करून त्याचे छोटे तुकडे करा. आता ते उकळवा. यानंतर मिक्सरमध्ये चांगले बारीक करा. व एका भांड्यात काढा. आता त्यामध्ये थोडे थंड दही, थंड पाणी घाला आणि चांगले मिसळा. आता एका पॅनमध्ये तूप घाला. गरम झाल्यावर त्यात जिरे, बारीक चिरलेले आले, हिरवी मिरची घालून परतून घ्या. ते दह्याच्या मिश्रणात घाला आणि चांगले मिसळा. आता ते एका ग्लासमध्ये ओता आणि वर काही पुदिन्याची पाने आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. तसेच बर्फाचे तुकडे घाला. तर चला तयार आहे आपले उन्हाळा विशेष बीटरूट बटरमिल्क रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ:
Edited By- Dhanashri Naik