Lucknow Super Giants vs Mumbai Indians Marathi Update: मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 'कानफाटे' ठरले. स्फोटक फलंदाज मिचेल मार्श पहिल्याच चेंडूवर बाद झाला असता, परंतु एकानेही अपिल केले नाही आणि त्याने ३१ चेंडूंत ६० धावांची आक्रमक खेळी केली. १२९२ दिवसानंतर आयपीएल सामना न खेळणाऱ्या रोहित शर्मानेच संघाला मदत केली आणि डग आऊटमध्ये बसून चक्र फिरवली. तेव्हा कुठे मिचेल मार्शची विकेट मिळाली.
कर्णधार हार्दिक पांड्याने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माला आज दुपारी नेट्समध्ये दुखापत झाल्यामुळे आजच्या सामन्याला मुकावे लागणार असल्याचे हार्दिकने जाहीर केले. मुंबई इंडियन्सने आजच्या सामन्यात राज अंगद बावा याला पदार्पणाची संधी दिली. . दीपक चहर व ट्रेंट बोल्ट यांनी मुंबईच्या गोलंदाजीची सुरुवात केली आणि पहिल्याच षटकात मिचेल मार्शची विकेट मिळाली असती, परंतु मुंबईच्या खेळाडूंनी अपीलच केले नाही.
चेंडू बॅटला हलकासा घासून यष्टिरक्षक रायन रिकेल्टनच्या हाती विसावला. पण, मैदानावर एवढा आवाज होता की चेंडू व बॅटच्या स्पर्शचा आवाजच ऐकू आला नाही. त्यामुळे कोणीच अपील करण्याची तसदी घेतली नाही. मात्र, रिप्लेमध्ये बॅट व चेंडूचा संपर्क झाल्याचे दिसल्यावर सर्वांना आश्चर्य वाटले. मार्शने मिळालेल्या संधीचं सोनं करताना तुफान फटकेबाजी केली. त्याने ७ षटकांत एडन मार्करमसह ७६ धावा जोडल्या. त्यात मार्शच्या ६० धावा होत्या आणि त्यात ९ चौकार व २ षटकारांचा समावेश होता.
स्ट्रॅटेजीक ब्रेकमध्ये रोहित शर्मा डग आऊटमधून मैदानावर आला आणि खेळ संथ करण्यासाठी फिरकीपटू विग्नेश पुथूरला गोलंदाजी करण्यास सांगितले. हार्दिकने त्याचे ऐकले अन् विग्नेशने कॉट अँड बोल्ड करून मार्शला बाद केले. मुंबईला ७६ धावांवर पहिले यश मिळाले. त्यानंतर हार्दिकने बाऊन्सरवर निकोलस पूरनला ( १२) माघारी पाठवून LSG ला मोठा धक्का दिला.
मुंबईचा संघ - विल जॅक्स, रायन रिकेल्टन, सूर्यकुमार यादव, नमक धीर, हार्दिक पांड्या, आर बावा, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, विग्नेश पुथूर, अश्वनी कुमार
लखनऊ सुपर जायंट्स - मिचेल मार्श, एडन मार्करम, निकोलस पूरन, रिषभ पंत, डेव्हिड मिलर, आयुष बदोनी, अब्दुल समद, दिग्वेश राठी, शार्दूल ठाकूर, आवेश खान, आकाश दीप.