म्यानमानरनंतर आता नेपाळमध्ये भूकंप झाला आहे. ५ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप असून उत्तर भारतात याचे सौम्य धक्के जाणवले.
Nashik Live: गोदावरीच्या किनारी गावात दुभत्या जनावरांसाठी मच्छरदाण्यांचा वापर- गोदावरी काठावरील गावांमध्ये चक्क दुभत्या जनावरांसाठी मच्छरदाणी
- गोदावरी नदी तीरावरील माडसांगवी आणि अन्य काही गावांमध्ये प्रत्येक घराबाहेर जनावरांसाठी मच्छरदाणी लावण्याची वेळ
- गोदावरी नदीला जलपर्णीच्या प्रदूषणाचा विळखा, परिसरात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती
- डासांचे लोळच्या लोळ परिसरातील ग्रामस्थ आणि जनावरांवर करतात हल्ला
- रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे देखील ग्रामस्थांना मुश्किल
- डासांच्या हल्ल्यामुळे जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त
- रोगराईमुळे दुखते जनावरांच्या उत्पादन क्षमतेवर देखील विपरीत परिणाम
- पाच हजार रुपये खर्च करून शेतकऱ्यांना जनावरांसाठी विकत घ्यावी लागते मच्छरदाणी
Live: भंडाऱ्यात IPL अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दुचाकीसह 3 मोबाईल जप्तआयपीएलच्या क्रिकेट मॅचवर सट्टा लावून नागरिकांसोबत आर्थिक व्यवहार करणाऱ्या भंडाऱ्याच्या एलसीबी पथकाने छापा घातलाय. या कारवाईत दुचाकीसह तीन मोबाईल जप्त करम्यात आले आहेत. तसंच याप्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे.
Live : जवानाच्या घरातून दागिने चोरीला, शिपाईच निघाला चोरपुण्यात सैन्य दलातील जवानाच्या घरातून दागिने चोरीला गेले होते. दरम्यान आरोपीकडून 16 तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. सैन्य दलातील शिपायानेच चोरी केल्याच तपासाअंती समोर आलं आहे.
Live : डॉ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलबाहेर रास्ता रोको Live: पंतप्रधान मोदींची बँकॉकमधील दुसित पॅलेसमध्ये थायलंडच्या राजा आणि राणी सोबत शाही भेटपंतप्रधान मोदी यांनी आज बँकॉकमधील दुसित पॅलेसमध्ये थायलंडचे राजा महा वजिरालोंगकोर्न फ्रा वजिराकलाओचायुहुआ आणि राणी सुथिदा बज्रसुधाबीमललक्षणा यांच्याशी शाही भेट घेतली.
Live: गोंदिया-बल्लारशा रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासाठी ४,८१९ कोटींची मंजुरी, ४ जिल्ह्यांना विशेष लाभमहाराष्ट्रातल्या गोंदिया-बल्लारशा रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचा प्रकल्प असून त्यासाठी ४ हजार ८१९ कोटी रुपये खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.
२७८ किलोमीटरच्या या रेल्वेमार्गामुळे गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर अशा ४ जिल्हयांना विशेष लाभ मिळेल.
Nanded Live: ट्रॅक्टर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर; मुख्यमंत्र्यांची घोषणानांदेड आले गावात ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आणि आठ जणांचा मृत्यू झाला. ही घटना नांदेड- हिंगोली जिह्याच्या सेमीवर झाली आहे.
यामुळे ट्रॅक्टर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर असी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे.
Shahapur Live : शहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरीशहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसाबरोबर गारपीटही झाली. त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहेत.
Live : सारंगी महाजन यांच्या अर्जावर लवकरच सुनावणी होणारसारंगी महाजन यांच्या जमिनीतील वादासंदर्भांतील अर्जावर 3 मे ला सुनावणी होणार आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सहकाऱ्यांकडून जमिनी संबधीतील वादावर ही सुनावणी होणार असल्याची चर्चा आहे.
Nashik Live : दरेगावला रुग्णालय सुरु करण्याची ग्रामस्थांची मागणीमालेगावमधील दरेगाव परिसरात 100 खाटांच रुग्णालय सुरु करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात नवीन वसाहती उदयास येत आहे. येथे कोकणदरा, इनामदरा १ व २, दहा खोल्या, कुंदरा वस्ती या आदिवासी वस्त्या आहेत. येथील आदिवासी बांधव गेल्या अनेक वर्षापासून शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित आहेत. त्यामुळे रुग्णालय बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Pune Live: आळंदीतील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळलीलाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतरही इंद्रायणी नदीच्या प्रदूषणावर कोणताही तोडगा निघालेला नाही. पिंपरी चिंचवड आणि इंद्रायणी नदीच्या परिसरातील अनेक कंपन्या केमिकल युक्त पाणी इंद्रायणी नदीमध्ये सोडत निदर्शनास आलं आहे.
Beed Live: धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुनावणी पुढे ढकललीकरुना मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारी संदर्भातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता 3 मे रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
Pune Live: दीनानाथ रूग्णालयाचे प्रशासक पालेकर यांच्या तोंडावर शिवसेना कार्यकर्त्यांनी फेकल्या बनवाट नोटा- दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात गर्भवती महिलेला अॅडमिट करण्यासाठी 10 लाखांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला असून या महिलेच्या पतीने हा आरोप केला आहे.
- याच प्रकरणाविषयी संताप व्यक्त करताना शिवसेना कार्यकर्त्यांनी रूग्णालयाचे प्रशासक पालेकर यांच्या तोंडावर बनवाट नोटा फेकल्या.
Nashik Live: इगतपुरीत जमावाकडून पोलिसांवर जीवघेणा हल्ला- नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पोलिसांना जमावाची मारहाण.
- पोलिस ठाण्याचे कृष्णा गोडसे आणि रामदास वाघ यांचे कपडे फाडले.
- झाडावर लटकलेल्या मृतदेहाची चौकशी करण्यासाठी इगतपुरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले.
- पोलिसांनी फाशी घेतल्याचा दावा केल्याने आदिवासी जमाव संतप्त.
- चार दिवसांपूर्वी झाली होती घटना, किरकोळ गुन्हा दाखल करत पोलिसांचे या घटनेकडे दुर्लक्ष.
Pune Live: दीनानाथ रुग्णालयातील प्रकरणाविषयी चौकशीचे आदेश- अजित पवारदीनानाथ रुग्णालयातील घटनेच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून, चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
आयुक्तांच्या वाहनावर पैसे उधळत माजी नगर सेवकांनी केला निषेधचंद्रपूर शहरात धुळ, खड्डे अनावश्यक खोदकाम व महानगरपालिकेतील घोटाळ्याच्या विरोधात माजी नगरसेवक पप्पू देशमूख यांच्या नेतृत्वात चंद्रपूर महानगरपालिकेच्या समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पप्पू देशमुख यांनी आयुक्तांच्या गाडीवर पैसे उडविले आणि निषेध केला. यावेळी महास्वाक्षरी अभियान घेत सह्यांचे पत्र मुख्यमंत्री यांना पाठविण्यात येणार आहे.
हिंमत असेल तर कारवाई करा- संजय राऊतहिंमत असेल तर कारवाई करा असे संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.
Nashik : नाशिकमध्ये कर्जमाफीसाठीचे मनसेचे गाजर आंदोलनशेतकऱ्यांचा सातबारा कोरा मिळावा, तसेच अन्य मागण्यांसाठी नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले.
नाशिकच्या त्र्यंबकरोड परिसरात मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हातात गाजर घेऊन आंदोलनात सहभागी झाले.
शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींना शिक्षा होणे आवश्यक आहे, या आणि इतर मागण्यांसाठी मनसेने आज एक दिवसीय लक्षणीय आंदोलन आयोजित केले.
Live : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातिल गर्भवती मृत्यू प्रकरणात दिशाभूल करणारी आणि अपूर्ण माहिती समोर आली आहे- पालेकरभाजप आमदार अमित गोरखे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आंदोलन सुरू.
रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय शासनाला अहवाल सादर करणार, असे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.
रुग्णालयाचे पीआरओ रवी पालेकर यांनी सांगितले की, रुग्णालयाने सर्व माहिती सरकारकडे दिली आहे.
पालेकर यांनी दिशाभूल करणारी आणि अपूर्ण माहिती समोर आल्याचे म्हटले.
शिंदे गटाच्या शिवसेनेने या प्रकरणावर रवी पालेकरांकडे निवेदन दिले आहे.
Deenanath Mangeshkar Hospital Case Live: ...तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर अत्यंत कडक कारवाई करून गुन्हे दाखल करू - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेमी जिल्हाधिकारी यांना बोललो आहे, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला अनेक फॅसिलिटी दिल्या आहेत. त्यांचे जर कर्मचारी असे करत असतील तर अत्यंत कडक कारवाई करून गुन्हे दाखल करू - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
Mangal Prabhat Lodha Live: महाराष्ट्रात जागतिक कौशल्य केंद्र उभारणार - कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढामहाराष्ट्रात जागतिक कौशल्य केंद्र उभारणार - कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
सिंगापूरचे वाणिज्यदूत ओंग मिंग फुंग यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक
युवकांना जागतिक दर्जाचं ट्रेड प्रशिक्षण मिळणार
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच प्रशिक्षण सुरू
चार सदस्य समिती करणार दीनानाथ हॉस्पिटलची चौकशी
यामध्ये एक स्त्री रोग तज्ञ यांचा समावेश
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या आरोग्य उपसंचालकांना फोनवरून सूचना
समिती स्थापन करून करणार दिनानाथ हॉस्पिटलची आज पाहणी
राधाकिसन पवार यांच्या अहवालावरून दीनानाथ वरती केली जाणार कारवाई
Nandurbar Live : नंदुरबार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊसनंदुरबार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतपिकांचही मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
Live : संत रूपालाल महाराज पुण्यतिथी सोहळा, २२ हजार भाविकांची हजेरीअमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील आराध्य दैवत असलेले राष्ट्रसंत रुपालाल महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता करण्यात आली..
या पुण्यतिथी सोहळ्याला 22 हजार भाविकांनि उपस्थिती लावली होती..
रूपालाल महाराजांचा पालखी सोहळा अंजनगाव शहरातून रथाची ढोल,ताशे,दिंड्या, टाळ मृदुंगाच्या गजरात विविध धार्मिक वेशभूषांसह संपूर्ण शहरातून शोभायात्रा काढण्यात आली..
निरोप मार्ग सर्व भाविकांनी सुशोभित केला होता..
शोभा यात्रेनंतर काल्याचे किर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला.. यावेळी पोलिसांचा चौक बंदोबस्त पाहायला मिळाला..
Nanded Live : नांदेडमध्ये ट्रॅक्टर विहीरीत कोसळल्याने ८ जण अडकलेनांदेडच्या आलेगावात ट्रॅक्टर विहीरीत कोसळल्याने ८ जण अडकले आहेत.
सातबारा कोरा कुठंय? पायथान काढून विचाराच, राजू शेट्टींचा सरकारला इशाराराज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येण्यापूर्वी, तेव्हा शेतकऱ्यांना मोठं आश्वासन दिलं गेलं
संपूर्ण पिक कर्जमाफी आणि सातबारा कोरा मात्र प्रत्यक्षात काहीच झालं नाही.
त्यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी थेट सरकारला लक्ष्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्याचं आवाहन केलं आहे.
आणि लाव रे तो व्हिडिओ म्हणत देवेंद्र फडणवीस यांची क्लिप सभेत वाजवून दाखवली.
मुख्यमंत्री आता सहा तारखेला वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी कारंजा इथं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं.
आता शेतकऱ्यांनी त्यांच्या पायातील पायथान काढून त्यांना विचारलं पाहिजे – आमचं कर्ज कधी माफ होणार?"
Saundatti Renuka Temple : भाविकांना मिळणार आता घरपोच 'ई-प्रसाद', सौंदत्ती रेणुका मंदिराचा समावेशबेळगाव : देवदर्शनासाठी येऊ न शकणाऱ्या भाविकांसाठी ‘ई-प्रसाद’ सेवाद्वारे घरपोच प्रसाद देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘ना नफा ना तोटा‘ या तत्त्वावर भाविकांना ही सेवा देण्यासाठी १०० ते २०० पर्यंत दर निश्र्चित करण्यात आला आहे. सौंदत्ती येथील रेणुका (यल्लमा) मंदिराचा समावेश आहे. राज्याचे धर्मादाय खात्याचे मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्या हस्ते बंगळूर येथे नुकताच ‘ई-प्रसाद’ सेवेचा प्रारंभ केला.
Waqf Bill : वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर होताच मायावतींची सरकारवर टीका; म्हणाल्या, याचा गैरवापर केला तर मुस्लिम समुदायाला..संसदेने वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर केल्यानंतर, बसप प्रमुख मायावती म्हणाल्या, "संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयकावर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघांचे म्हणणे ऐकल्यानंतर, असा निष्कर्ष निघतो की, केंद्र सरकारने हे विधेयक समजून घेण्यासाठी जनतेला आणखी थोडा वेळ दिला असता आणि ते सादर करण्यापूर्वी त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले असते तर ते बरे झाले असते. परंतु, दुःखाची गोष्ट म्हणजे सरकारने हे विधेयक खूप घाईघाईने आणले आणि ते मंजूर केले आहे, जे योग्य नाही. आता हे विधेयक मंजूर झाले आहे. जर सरकारने त्याचा गैरवापर केला तर पक्ष मुस्लिम समुदायाला पूर्ण पाठिंबा देईल, म्हणजेच अशा परिस्थितीत पक्ष या विधेयकाशी सहमत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कागल : पुण्याहून बंगळूरकडे निघालेला कुरिअर वाहतूक करणारा ट्रक ब्रेक निकामी झाल्यामुळे उलटला. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कागलजवळील लक्ष्मी टेकडीजवळ हा अपघात झाला. या अपघातात ट्रकचालक किशन गुप्ता (वय २८) बचावला. मात्र, ट्रकमधील कुरिअर सामानाचे मोठे नुकसान झाले. पुणे-बंगळूर महामार्गावर सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. लक्ष्मी टेकडीसमोरील रस्ताही अपूर्ण असल्याने तेथून वाहने वारंवार घसरतात. गुरुवारी पहाटे याच अपूर्ण रस्त्यामुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ब्रेक निकामी झाल्याने ट्रक उलटला. या घटनेची कागल पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद झालेली नव्हती.
Unseasonal Rain LIVE : अवकाळी पावसाचा नाशिक शहराच्या पाणीपुरवठ्याला फटका- अवकाळी पावसामुळे महावितरणच्या सातपूर फिडरमध्ये बिघाड
- निम्म्याहून अधिक शहराचा सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत
- महावितरणच्या सातपूर फिडरवरील दुरुस्तीच्या कामासाठी गंगापूर धरण पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा बंद
- दुपारी 12 ते संध्याकाळी उशिरापर्यंत अनेक भागात कमी दाबाने होणार पाणीपुरवठा
Chhatrapati Shahu Terminus LIVE : कोल्हापूर ते कटिहार विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस रविवारपासूनकोल्हापूर : छत्रपती शाहू टर्मिनसवरून दर रविवारी कोल्हापूर ते कटिहार (बिहार) विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू होत आहे. तिची पहिली फेरी येत्या रविवारी (ता. ६) सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार आहे. उन्हाळी सुटीत उत्तर भारतात जाणाऱ्या बिहारवासीयांसाठी ही एक्स्प्रेस सुरू केली आहे. केवळ उन्हाळी सुटीच्या ६ ते २७ एप्रिल या कालावधीत ती धावणार आहे.
Shah Nawaz Malik Resigns LIVE : नितीश कुमार यांना धक्का; वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर होताच JDU अल्पसंख्याक प्रदेश सचिवाचा राजीनामावक्फ दुरुस्ती विधेयकाबाबत पक्षाच्या भूमिकेमुळे JDU अल्पसंख्याक प्रदेश सचिव शाह नवाज मलिक यांनी पक्ष आणि इतर पदांचा राजीनामा दिलाय. "आमच्यासारख्या लाखो भारतीय मुस्लिमांचा असा अढळ विश्वास होता, की तुम्ही पूर्णपणे धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे ध्वजवाहक आहात. पण, आता हा विश्वास तुटला आहे. वक्फ विधेयक दुरुस्ती कायदा २०२४ बाबत JDU च्या भूमिकेमुळे लाखो भारतीय मुस्लिम आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे," असे पत्रात म्हटले आहे.
देशभक्तीपर चित्रपटांसाठी आणि 'भारत कुमार' या टोपणनावासाठी ओळखले जाणारे भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले.
मिरज : पोलिसांच्या कारवाईत जप्त करण्यात आलेला अवैध दारूसाठा नष्ट करण्यात आला. महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याने विशेष मोहीम राबवून ही कारवाई केली. नऊ गुन्ह्यांत जप्त केलेला ३८ हजार ४०० रुपये किमतीचा सुमारे ११० लिटर दारूसाठा नष्ट करण्यात आला.
Shaktipeeth Highway LIVE : 'शक्तिपीठ'प्रश्नी उद्या उपमुख्यमंत्री शिंदेंना रोखणार, शक्तिपीठविरोधी संघर्ष समितीचा इशाराकोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शक्तिपीठ महामार्ग रद्द करतो व शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो, असे आश्वासन देणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती सरकारने घुमजाव केला आहे. त्यामुळे शनिवारी (ता. ५) कोल्हापूर दौऱ्यात त्यांच्यासमोर कुणाल कामराचे गाणे लावून त्यांना रोखले जाईल, असा इशारा आज शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीतर्फे आज येथे देण्यात आला. शासकीय विश्रामगृह येथे संघर्ष समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
Prajwal Revanna LIVE : माजी खासदार प्रज्वल रेवण्णाला न्यायालयाचा आणखी एक धक्काबंगळूर : अत्याचार प्रकरणात तुरुंगात असलेला माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याला न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. बंगळूरमधील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने प्रज्वल रेवण्णा याची अत्याचाराचा खटला रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. अत्याचार प्रकरणाची सुनावणीही नऊ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. के. आर. नगर अत्याचार प्रकरणात पीडित महिलेची कोणतीही भूमिका नाही. त्यामुळे प्रज्वल याच्या वकिलाने त्यांना खटल्यातून काढून टाकण्यासाठी याचिका दाखल केली होती. ही याचिका लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने फेटाळून लावली. त्याचवेळी, न्यायाधीशांनी आरोपींवरील आरोपांवर भर दिला. आरोप वाचून दाखवले जात असताना न्यायाधीशांसमोरच प्रज्वल याने अश्रू ढाळल्याची घटना घडली.
Waqf Bill LIVE : 'वक्फ' विधेयकावर संसदेची मोहोर; राज्यसभेतही मध्यरात्री दोननंतर 128 विरुध्द 95 मतांनी विधेयक मंजूरLatest Marathi Live Updates 4 April 2025 : बहुचर्चित वक्फ दुरुस्ती विधेयक अखेर संसदेमध्ये मंजूर झाले असून, आज मध्यरात्री वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेनेही त्यावर मान्यतेची मोहोर उमटविली. तब्बल बारा तासांपेक्षाही अधिक काळ चाललेल्या चर्चेनंतर हे विधेयक राज्यसभेत १२८ विरुध्द ९५ मतांनी मंजूर करण्यात आले. तसेच अवघ्या जगाचे लक्ष ज्याच्याकडे लागले होते त्या अमेरिकेच्या बहुचर्चित जशास तसे आयातशुल्क धोरणाची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यानंतर जागतिक अर्थकारणाला मोठे हादरे बसले. जगभरातील बहुतांश शेअर मार्केटमध्ये मोठी घसरगुंडी पाहायला मिळाली. राज्यात सर्वच पिकांसाठी खरीप हंगामापासून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारशी सामंजस्य करार करण्यात येणार असून देशात असा प्रयोग करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शक्तिपीठ महामार्ग रद्द करतो व शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो, असे आश्वासन देणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती सरकारने घुमजाव केला आहे. त्यामुळे शनिवारी (ता. ५) कोल्हापूर दौऱ्यात त्यांच्यासमोर कुणाल कामराचे गाणे लावून त्यांना रोखले जाईल, असा इशारा शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीतर्फे देण्यात आला. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत असून काही भागांत पाऊस पडत असून पिकांचे नुकसान होत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..