Ashok Ma. Ma : अशोक मामांच्या आयुष्यात नव्या पाहुण्यांची एन्ट्री, राधा मामी अन् किशा काकांच्या येण्यानं मालिका घेणार नवं वळण
Saam TV April 05, 2025 06:45 PM

'अशोक मा.मा.' (Ashok Ma.Ma) मालिका सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या मालिकेत आता नवीन कलाकरांची एन्ट्री पाहायला मिळाली आहे. मालिका आता कोणते वळण घेणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'अशोक मा.मा.' मालिकेत राधा मामी आणि किशा काकांची धमाकेदार एन्ट्री झाली आहे. चंद्रपूरच्या ओवळा गावातून राधा मामी आणि किशा काका आले आहेत. हे मालिकेत आता कथेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

पहिल्यांदाच आलेल्या या जोडप्यासाठी शहरातले वातावरण नवीन असले तरी त्यांची ठाम विचारसरणी आणि श्रद्धाळूपणा त्यांना वेगळे ठरवतो. विशेष म्हणजे भैरवीच्या तडक-फडक स्वभावाशी त्यांची गाठ पडणार असून यातून अनेक घडामोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. आता प्रेक्षकांचे धमाल मनोरंजन होणार आहे. राधा मामींची भूमिका वर्षा दांदळे तर किशा काकांची भूमिकेत प्रकाश डोईफोडे दिसणार आहेत.

'मा.मा.' मालिकेत प्रियाने केलेल्या नाटकानंतर भैरवीला राधा मामींनी चांगलेच सुनावले. त्यांच्या दृष्टीने भैरवीने संयमाने आणि मायेने वागले पाहिजे. मात्र, भैरवीच्या तडक फडक वागण्यामुळे दोघींमध्ये ठिणग्या उडाल्या. आता भैरवी राधा मामींना आपली बाजू पटवून देऊ शकेल का? पाहणे ठरणार आहे.

वेणूच्या भावाला आणि वहिनीला योग्य पाहुणचार देण्याचे अशोक मामांनी ठरवले असले तरी या सगळ्या गोंधळात ते नेमकी कशी भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भैरवीच्या स्वभावाचा अंदाज त्यांना आहे. मात्र राधा मामींची थोडीशी शिस्तबद्ध आणि कठोर बाजू त्यांच्यासाठी नवीन आहे. राधा मामी भैरवीला चांगलेच आव्हान देणार आहे. येत्या भागांमध्ये मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 'अशोक मा.मा.' मालिका कलर्स मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता पाहायला मिळते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.