बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) कायम त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि चित्रपटांमुळे चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या आगामी चित्रपट 'लव्ह अँड वॉर' च्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि 'छावा' फेम विकी कौशल देखील पाहायला मिळणार आहे. संजय लीला भन्साळी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. मात्र आता रणबीर कपूर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.
कपूर लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण (Hollywood Debut ) करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सुपरस्टार रणबीर कपूर चित्रपट 'जेम्स बाँड' म्हणून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे बोले जात आहे. ॲक्शन मास्टर मायकेल बे यांच्या दिग्दर्शनाखाली तो हॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार आहे.
'बाँड' चित्रपटातील एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरसोबत निर्मित्यांची चर्चा सुरू असल्याचे बोले जात आहे. या चित्रपटाच्या शूटिंगची सुरूवात 2025 मध्ये होण्याची अपेक्षा आहे. रणबीर कपूरच्या हॉलिवूडमधील पदार्पणाविषयी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही आहे. मात्र या चर्चेने चाहत्यांना खूप आनंदा झाला आहे. चाहते रणबीर कपूरला चित्रपटामध्ये पाहण्यासाठी आतुर आहेत.
मायकल बे यांनी ट्रान्सफॉर्मर्स आणि बॅड बॉइज यांन सारखे सुपरहिट चित्रपट केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ब्रिटिश अभिनेता चिवेटेल एजिओफोर देखील चित्रपटात सामील होण्याची चर्चा सुरू आहे.
रणबीर कपूरचे चित्रपटरणबीर कपूरने 2007मध्ये 'सावरियाँ' चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपट केले आहेत. अलिकडेच रिलीज झालेला 'ॲनिमल' चित्रपटामुळे त्याला खूप लोकप्रियता मिळाली आहे. त्याने अनेक कॉमेडी आणि रोमँटिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली आहे.